शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्वत्र संततधार; नदी -नाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 05:00 IST

तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पावसाची झळ सुरू आहे. सद्यस्थितीत कापूस व सोयाबीन लागवड झाली. भातशेतीचे पऱ्हे टाकण्याचे कामही आटोपले. पह्यांची योग्य वाढल्यास सर्वच शेतकरी रोवणीला सुरुवात करतील. मात्र, त्यासाठी रोवणीला अनुकूल पाऊस पडणे अत्याश्यक आहे. सलग तीन-चार दिवसांच्या झळीने नाल्यांना पूर आला. शेतातील बोड्याही आता तुडुंब भरू लागल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून झळ सुरू असतानाच सर्वत्र मुसळधार बरसल्याने नाल्यांना पूर आला तर, काही नजीकच्या गावांची शुक्रवारी सकाळी तारांबळ उडाली होती. नाल्याच्या पुलावरून पाणी वाहल्याने काही गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. दरम्यान, संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नदी व नाल्याकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला. शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याने शेतकरी सध्या सुखावला आहे.विभागीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पावसाची झळ सुरू आहे. सद्यस्थितीत कापूस व सोयाबीन लागवड झाली. भातशेतीचे पऱ्हे टाकण्याचे कामही आटोपले. पह्यांची योग्य वाढल्यास सर्वच शेतकरी रोवणीला सुरुवात करतील. मात्र, त्यासाठी रोवणीला अनुकूल पाऊस पडणे अत्याश्यक आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. सलग तीन-चार दिवसांच्या झळीने नाल्यांना पूर आला. शेतातील बोड्याही आता तुडुंब भरू लागल्या आहेत.

धान उत्पादक तालुक्यांत रोवणी  आधीच पऱ्हे टाकलेल्या सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल, सावली, पोंभुर्णा व चिमूर तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी रोवणी सुरू केली. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे. 

कापूस-सोयाबीन तरारले वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, गोंडपिपरी, जिवती, कोरपना तालुक्यात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी अधिक आहेत.  पावसाने कापूस व सोयाबीन अंकूर तरारले. या दोन्ही पिकांत बऱ्याच शेतकऱ्यांनी तूर लावल्याने सध्या तरी पिकांची स्थिती चांगली आहे.

माजरी रेल्वे मार्गावरची माती कोसळली

माजरी : माजरी खदान-माजरी जंक्शन रेल्वे रुळावरची माती कोसळल्याने या रेल्वे मार्गावरून जाणारी कोळसा वाहतूक शुक्रवारी दीड तास ठप्प झाली होती.परिसरात सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास  माजरी खदान-माजरी जंक्शन या मार्गावर शिरना नदीच्या पुलानजीक रेल्वे मार्गावरची साईड बंकिंगची  माती कोसळली. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली.  सदर मालगाडी पोल क्र. ८४४ आर/१८ जवळ सकाळी ९ वाजेपर्यंत तब्बल दीड तास उभी होती. त्यामुळे अन्य गाड्यांचे वेळपत्रक बदलले.

...तर दुर्घटना घडली असती- कोळसा वाहतूक करणारी मालगाडी लोड घेऊन वणीच्या रेल्वे साइडिंगवरून माजरी जंक्शनच्या दिशेने निघाली होती. दरम्यान शिरना नदीच्या पुलाजवळ रेल्वे मार्गावर साइड बंकिंगची  माती कोसळली, अशी माहिती एका नागरिकाने इंजिन ड्रायव्हरला दिली. दरम्यान इंजिन ड्रायव्हरने लगेच सतर्कता दाखवित गाडी थांबविली. घटनेची माहिती मिळताच  वणीचे सिनिअर सेक्शन इंचार्ज राजन हिरे,वरोराचे एडीएन राणे हे घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी परिस्थिती पाहून मालगाडीला वळविले.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर