शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

ग्रामीण तरूणाई लकी ड्राच्या विळख्यात; पोलिसांनी कठोर पाऊल उचलण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:32 IST

Chandrapur : लकी ड्रावर कायद्याने बंदी असूनही याठकबाजांच्या जाळ्यात तरूणाई

लोकमत न्यूज नेटवर्क घोसरी : लकी ड्रा द्वारे दुचाकी व अन्य आकर्षक बक्षिस देण्याची टोळी गावागावात पिरत असल्याने ग्रामीण भागातील तरूणाई विळख्यात सापडत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव परिसरात काही शेतकऱ्यांनाही या लकी ड्रा ने गंडा घातल्याने पोलिसांनी कठोर पाऊल उचलावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

घोसरी व नांदगाव परिसरात काही महिन्यांपासून लकी ड्रा चालविणायांची टोळी राजरोसपणे पिरत आहे. अशा प्रकारच्या लकी ड्रावर कायद्याने बंदी असूनही याठकबाजांच्या जाळ्यात तरूणाई सापडत आहे. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीतील एका कथित बचतगटद्वारे समाधान भव्य उपहार योजना लकी सुरू करण्यात आला. हा ड्रॉ नसून स्वयंरोजगार असल्याचा दावा आयोजकाकडून करण्यात आला. ड्रा काढणायांना दुचाकी व विविध आकर्षक बक्षिसांचे आमिष दाखविण्यात आले. ड्रा च्या नावावर सदस्यांची एक लिंक तयार करण्यात आली. एका साखळीत ९९९ सदस्यांचा समावेश असतो. सदस्यांना लाखांची उलाढाल करणे अपेक्षित आहे. यात दुचाकीपासून अनेक वस्तु देण्याचे आमिष दाखविल्याने परिसरातील अनेक युतक बळी पडत आहे. गंडवल्या जात असूनही बदनामी होईल, या भीतीने तक्रारी झाल्या नाही. 

या योजनांचे दाखवतात आमिष काही ड्रा चालक फसव्या, आकर्षक, जास्त व्याजदराच्या योजना, कमी कालावधीत दामदुप्पट रक्कम देणाऱ्या योजना चालवतात. साखळी पद्धतीने रक्कम जमा करून लकी ड्रॉच्या योजना राबवतात. संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या फसव्या पिग्मी योजना, फिक्स डिपॉझिट स्किमची भूरळ गावातील मध्यवर्ग कुटुंबांनाही पडल्याचे दिसून येत आहे. 

पोलिसांनी ड्रॉचा भंडाफोड करावा 

  • लकी ड्रा च्या नावाने पैसे गोळा करण्याचे काम सुरू असून या व्यवसायाने परिसरात जम बसविला आहे. यामध्ये बेरोजगार युवकांसोबतच मोबदल्याच्या लालसेने काही शेतकरी देखील सहभाग घेत आहे. 
  • फसव्या योजनांना नागरिकांनी बळी पडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने लकी ड्रॉचा भंडाफोड करत कारवाई करण्याची मागणी आहे.
टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर