शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी-विरोधकांत जुंपली

By admin | Updated: May 3, 2017 00:46 IST

जिल्हा परिषदेत सर्व लेखा शिर्षकाअंतर्गत २०१६-१७ मध्ये प्राप्त निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी विशेष सभा घेण्यात आली.

जिल्हा परिषदेची सभा : उडवाउडवीच्या उत्तराने विरोधकांचा सभात्याग

चंद्रपूर : जिल्हा परिषदेत सर्व लेखा शिर्षकाअंतर्गत २०१६-१७ मध्ये प्राप्त निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी विशेष सभा घेण्यात आली. सभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या खर्चाचा हिशेब घेतला. मात्र, खर्चाचा ताळमेळ न जुळल्याने सत्ताधारी-विरोधकांत चांगलीच जुंपली. सत्ताधारी उत्तर देऊ न शकल्याने सत्ताधाऱ्यांच्याविरोधात घोषणा देत विरोधकांनी सभागृहातून बहिर्गमन करीत निषेध नोंदविला.२०१६-१७ या आर्थिक वर्षात सर्व लेखा शिर्षकांतर्गत प्राप्त निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी विशेष सभा बोलाविण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजुकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याकडे केली होती. विरोधकांच्या मागणीनुसार भोंगळे यांनी तब्बल २७ दिवसानंतर मंगळवारी विशेष सभा बोलावली होती. जिल्हा परिषदेच्या सभगाृहात दुपारी १ वाजता सभेला सुरुवात झाली. यावेळी विरोधकांनी सर्व लेखा शिर्षकांतर्गत प्राप्त निधीच्या खर्चाचा आढावा देण्याची मागणी केली. परंतु सत्ताधाऱ्यांनी केवळ अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या निधीच्या खर्चाचा आढावा दिला. यामुळे विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर पाणी पुरवठा विषयावरुन चांगलेच वादळ उठले. १३ कोटी ५३ लाख १५ हजार रुपयांची तरतूद पाणी पुरवठ्यासाठी करण्यात आली होती मात्र या कामासाठी १४ कोटी २२ लाख ३४ हजार ५२५ रुपये खर्च झाले आहेत. सत्ताधाऱ्यांनी कंत्राटदारांची देयके काढण्यासाठी ६९ लाख १९ हजार ४२४ रुपयांचा अतिरिक्त खर्च केल्याचा आरोप काँग्रेस गटनेता डॉ. सतीश वारजुकर यांनी केला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी या विषयावर समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे काँग्रेसच्या २० जिल्हा परिषद सदस्यांसह चार पंचायत समिती सभापतींनी सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ घोषणा देत सभागृहातून बहिर्गमन केले. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, मुख्य कार्यपालन अधिकारी पापळकर, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अशोक शिरसे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)सत्ताधारी केवळ हारतुरे घेण्यात व्यस्त : वारजूकरस्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्रत्येक गावात शौचालय बांधकामाची मोहीम सुरु आहे. मात्र अनेक गावांतील कामे अपूर्ण आहेत. शेकडो लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थी आर्थिक चटके सोसत असताना जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे मात्र ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते हारतुरे घेण्यात धन्यता मानत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेता डॉ. सतिश वारजूकर यांनी पत्रकार परिषदेत केला. जिल्ह्यातील अनेक गावे हागणदारीमुक्त झाल्याचे दाखवून जिल्हा परिषद प्रशासनाकडून आपला गवगवा केला जात आहे. आजघडीला अनेक गावात शौचालय बांधकाम सुरु आहेत. परंतु ही गावे हागणदारीमुक्त झाल्याचे दाखविण्यात आले आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा २९ एप्रिलला पार पडला. मात्र, गतवर्षी बेसलाईन आणि रोहयो अंतर्गत बांधण्यात आलेली अनेक शौचालये अपूर्ण आहेत. तसेच रोहयोच्या माध्यमातून बांधकाम साहित्य खरेदीसाठी खर्च करण्यात आलेले १५ कोटी ८८ लाख ८८ हजार रुपये, १ कोटी ३२ लाख २ हजार रुपयांची मजुरीची रक्कम देण्यात आलेली नाही. तसेच या वर्षातील एक कोटी ५६ लाख १५ हजार रुपयांची मजुरीची रक्कम देण्यात आलेली नाही. परंतु जिल्हा परिषद प्रशासन सत्काराचा महोत्सव घेण्यात धन्यता मानत आहे. वित्त व लेखाधिकारी अनेक कामांची बिले काढण्यास दिरंगाई करतात असा आरोप डॉ. वारजुकर यांनी यावेळी केला. यावेळी प्रा. राजेश कांबळे, डॉ. आसावरी देवतळे, गजानन बुटके, रमाकांत लाधे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती उपस्थित होते.