शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

स्कूल बसमध्ये नियमांची ऐसीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:05 IST

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने स्कूल बससाठी चार वर्षांपूर्वी नियमावली लागू केली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा जीव धोक्यात : मर्जीनुसार आकारले जाते भाडे

मंगेश भांडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने स्कूल बससाठी चार वर्षांपूर्वी नियमावली लागू केली. मात्र असे असतानाही नियमावलीतील बहुतांश नियम धुडकावून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. मात्र आरटीओ किंवा पोलीस विभागाकडून अशा स्कूल बसचालकांवर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत असल्याचा प्रकार शुक्रवारी दीड वाजताच्या सुमारास ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनतून समोर आले.शालेय विद्यार्थी वाहतुकीतील वाहनांना झालेल्या अपघातांच्या कारणांचा शोध घेऊन या वाहतुकीबाबत स्वतंत्र धोरण राज्य शासनाने आखून कडक नियमावली केली. नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व शहर स्तरावरील मुख्य समितीबरोबरच शालेय स्तरावर प्रत्येकी एक समिती स्थापन करण्याचे नियोजन आहे.या समितीलाच बसचे भाडे व थांबे ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र अनेक शाळांनी समित्या स्थापन केल्या असल्या, तरी त्या केवळ दाखविण्यासाठीच असल्याने त्यांचे काम कागदावरच राहिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित करण्यासाठी या समितीचा काडीचाही उपयोग होत नाही. दुसरीकडे स्कूल बस नियमावलीनुसारच धावते का, हे शोधण्यासाठी प्रशासनाकडे कोणतीही कायमची व ठोस उपाययोजना नाही. काही वेळेला कारवाई होते व ती पुन्हा अनेक दिवसांसाठी थंडावते. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने स्कूल बस चालविणाºयांचे फावत आहे.पिवळ्या रंगाच्या बसचा सर्रास वापरस्कूल बसला पिवळा रंग व त्यावर संबंधित शाळेचे नाव, इतकाच नियम पाळून इतर सर्व नियमांना गुंडाळून ठेवत शहरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे चित्र आहे. प्रवासी वाहतुकीतून बाद झालेल्या गाड्यांना पिवळा रंग देऊन त्यांना स्कूल बस म्हणून रस्त्यावर आणण्याचे प्रकार अद्यापही सुरू आहेत. जुन्या मिनीबस व मारुती व्हॅनसारख्या वाहनांचा यात समावेश आहे. व्हॅनसारख्या वाहनामध्ये विद्यार्थ्यांना अक्षरश: कोंबून नेले जात आहे. तसेच अनेक स्कूल बसमध्ये नियमानुसार महिला सहायक नेमलेले नसल्याचेही दिसून आले.स्कूल बसचे भाडे मर्जीनुसारविद्यार्थी शाळेत कसा पोहोचतो, याची कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने विद्यार्थी शाळेच्या आवारात आल्यानंतरच शाळा त्याची जबाबदारी घेईल, अशी अनेक शाळांची भूमिका अद्यापही कायम आहे. त्यामुळे या शाळांमध्ये प्रशासन, वाहतूक ठेकेदार, पालक प्रतिनिधी व वाहतूक शाखेचे अधिकारी यांची समिती केवळ कागदावरच काम करते. कोणत्याही स्कूल बसचे भाडे नियमानुसार समिती ठरवत नाही, तर वाहतूक ठेकेदार व शाळा व्यवस्थापनाच्या मर्जीनुसाच भाडे ठरते.स्कूल बस नावापुरतीचनियमावलीमध्ये शाळेचे प्रशासन, बसचा ठेकेदार व प्रशासनाच्या जबाबदाºया निश्चित करण्यात आल्या आहेत. शालेय बसला पिवळा रंग व चालकाकडे पाच वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव, तसेच बिल्ला आवश्यक आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, रक्तगट, विद्यार्थ्यांचे थांबे आदींची माहिती तसेच विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी सहायकाची नेमणूक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही बस १५ वर्षांपेक्षा जुनी नसावी, असा नियम आहे. मात्र या नियमाची ऐसीतैशी होताना दिसते.आॅटोरिक्षाही धोकादायकअनेक विद्यार्थ्यांचे पालक स्कूल बसचे भाडे परवडत नाही म्हणून मुलासाठी आॅटोरिक्षा लावतात. मात्र आॅटोरिक्क्षामध्येही मुले सुरक्षीत नाहीत. लहान मुले आॅटोत बसल्यानंतर मस्ती करत असतात. मात्र याकडे आॅटोरिक्क्षा चालकाचे लक्ष नसते. ते वाहन चालवत असतात. अनेक आॅटोरिक्षांना सुरक्षेसाठी जाळी राहत नसल्याने अशावेळी विद्यार्थ्याचा तोल जाऊन विद्यार्थी खाली पडण्याची शक्यता असते.