शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

छतावर जाळे, भिंतीवर पिचकाऱ्या

By admin | Updated: January 14, 2015 23:04 IST

शासनाचे अनेक पुरस्कार पटकावत ‘स्वच्छ भारत मिशन’च्या माध्यमातून जिल्हाभर स्वच्छतेचे धडे देत निघालेल्या जिल्हा परिषदेतच अस्वच्छता पसरली आहे. याकडे मात्र, अधिकारी,

मिनी मंत्रालय घाणीने बरबटलेमंगेश भांडेकर - चंद्रपूरशासनाचे अनेक पुरस्कार पटकावत ‘स्वच्छ भारत मिशन’च्या माध्यमातून जिल्हाभर स्वच्छतेचे धडे देत निघालेल्या जिल्हा परिषदेतच अस्वच्छता पसरली आहे. याकडे मात्र, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण’ असे म्हणण्याची पाळी आली आहे. जिल्हा परिषद इमारतीत लागलेले विविध पोस्टर, बॅनर, याद्या, व नागरिक, कर्मचाऱ्यांनी मारलेल्या पिचकाऱ्यांमुळे इमारतीला अवकळा आली आहे. इमारतीत प्रवेश करताच छतावर जाळे, भिंतीवर पिचकाऱ्या हे दृष्य पाहायला मिळते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद कर्मचारी गावागावात धावपळ करीत आहेत. शहरापासून तर खेळ्यांपर्यंत या अभियानाची जनजागृती सुरु असून परिसर स्वच्छ ठेवण्याचे धडे नागरिकांना दिले जात आहेत. मात्र, जिल्हा परिषद इमारतीतच अभियान राबविण्याचा विसर पडल्याने अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येते.जिल्हा परिषद इमारतीत प्रवेश करताच दर्शनी भागावर नोटीस चिपकवलेली दिसतात. तर आत गेल्यावर वरच्या माळ्यावर चढताना पायऱ्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या आहेत. अस्वच्छता दूर करण्यासाठी पायऱ्यांवर टाईल्स लावण्यात आले. मात्र या टाईल्सही पिचकाऱ्यांनी रंगलेल्या आहेत. स्वच्छतागृहात प्रवेश करताच दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या दुर्गंधीचा सामना नागरिकांना व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे. मात्र, स्वच्छता करणार कोण, असे म्हणत सर्वंच गप्प आहेत. जिल्हा परिषदेत सफाई कर्मचारी आहेत. मात्र, ते नेमकी कुठली स्वच्छता करतात, याचा थांगपत्ता लागत नाही. जिल्हा परिषद इमारतीत फेरफटका मारला असता, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग जमा करुन दिसले.काही महत्वाच्या सूचना असल्यास प्रत्येक विभागात नोटीस बोर्डवर ती सूचना लावणे किंवा सूचना रजीस्टरवर नोंद करायची असते. मात्र, जिल्हा परिषद इमारतीत प्रत्येक विभागाच्या प्रवेशद्वारावर सूचना लिहलेली कागदे चिपकवण्यात आली आहेत. त्यामुळे भिंतीचा रंग दिसत नाही. कर्मचाऱ्यांच्या वेळा, शासकीय योजनांची माहिती, निवड यादी अशा विविध कागद, पोस्टरर्सनी भिंती रंगलेल्या आहेत. अधिकारी सरळ आपल्या कक्षात जाऊन बसतात. त्यांच्या कक्षासमोरील परिसराची नियमीत स्वच्छता केली जाते. मात्र, इतर विभागात गेले तर अस्वच्छता दिसून येते. याचा त्रास कर्मचारी व नागरिकांना सहन करावा लागत आहे.