शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

बल्लारपूर-चंद्रपूर मार्गाची रम्यता

By admin | Updated: July 15, 2015 01:12 IST

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द हिरवी श्रीमंती, लहान मोठे २२ वळणं, डांबर व सिमेंटद्वारे रोडच्या नूतनीकरणाने मार्गात आलेली चकाचकता व प्रशस्तता, ...

१२ किमी अंतरावर २२ वळण : हिरवी श्रीमंतीसदृश्य घाटरोडवसंत खेडेकर  बल्लारपूररस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द हिरवी श्रीमंती, लहान मोठे २२ वळणं, डांबर व सिमेंटद्वारे रोडच्या नूतनीकरणाने मार्गात आलेली चकाचकता व प्रशस्तता, मार्गात काही जागांवर घाटरोड सदृष्य उंच व सखलता, हिरवळीतून येणारी व स्पर्शाने आपली जाणीव करुन देणारी कधी हलकी व कधी सळसळणारी वाऱ्याची झुणूक... अशी मनभावन आल्हादकता रम्यता बल्लारपूर- चंद्रपूर बस मार्गावर बघायला, अनुभवायला मिळते. बारा किलोमीटर एवढ्या कमी लांबीच्या रोडवर २२ वळणं हे या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.या मार्गाच्या बाजूला पेपर मील कॉलनीजवळ रोड लगत टाकाऊ चुन्याने तयार झालेला बराच उंच व तेवढाच पसरट पहाड उभा आहे. स्लज गार्डन नावाने ओळखला जाणारा हा मानवनिर्मित पहाड उन्हाळ्याच्या दिवसता पांढरा-शुभ्र तर पावसाळा व हिवाळ्यात त्यावरील हिरव्या झाडांच्या-गवताच्या आवरणामुळे हिरवेगार होतो. पुढे एक दोन वळणं पार केल्यानंतर पावर हाऊस जवळ उंचवटा लागतो. तो पार केला की लगेच एका टेकडीला वळसा घालत परत उतार, उंच सखल हा भाग पार करताना घाटरोडचा हलकासा अनुभव येतो. बल्लारपूर बसस्थानक ते चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत एकूण २२ वळण आहेत. या दरम्यान वृक्षराशीसोबतच या रोडवर पेपर मील उद्योग, कलामंदिर, दर्गा, शासकीय केंद्रीय विद्यालय, वृद्धांची काळजी वाहणारे मातोश्री वृद्धाश्रम, त्याला लागूनच सैनिकी विद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रसिद्ध भिवकुंड नाला इत्यादी पुढे चंद्रपूर बस स्थानकापर्यंत ६ लहान-मोठे वळण आहेत. या मार्गावर बंगाली कॅम्पधील दुर्गा मंदिर, मच्छि नाला, सावरकर चौक, पोलीस मुख्यालय इत्यादी येतात. पूर्वी एकपदरी असलेला हा रस्ता आता चारपदरी झालेला आहे. आधुनिक रहदारीच्या नियमाप्रमाणे प्रत्येक वळणावर सुरक्षितेच्या दृष्टीने वाहनांकरिता दिशा दर्शक म्हणून रेडियम बिंदुची व्यवस्था करण्यात आली आहे. जे वाहनांच्या प्रकाशझोताने प्रखरपणे उजळतात आणि दिव्यांची एक मालिकाच तयार होते. रात्रीला हे दृष्य मनोभावन होते. दिवसा या रस्त्यावर वाहनधारकांना हिरवळीची सोबत तर रात्रीला वाहनांच्या दिव्याने उजळणारे हे दिवे अशी ही या रोडवरची रम्यता डोळ्यात साठवून ठेवावी अशी आहे. बल्लारपूर- चंद्रपूर या मार्गावरचा हा अनुभव साऱ्यांनीच घ्यावा !