शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

राकाँचा लॉलीपॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘अच्छे दिना’च्या नावाखाली केंद्र व राज्य सरकार जनतेची आर्थिक पिळवणूक करीत असून दिवसेंदिवस महागाईचा भस्मासूर वाढत असल्याने गोरगरीब व सामान्य जनता बेजार झाली आहे. बेजार झालेल्या नागरिकांचा आवाज शासन दरबारी पोहोचविण्यासाठी शुक्रवारी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चंद्रपुरात लॉलीपॉप मोर्चा काढण्यात आला.येथील गांधी चौकातील महात्मा ...

ठळक मुद्देमहागाईचा भस्मासूर वाढत असल्याने गोरगरीब व सामान्य जनता बेजार झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘अच्छे दिना’च्या नावाखाली केंद्र व राज्य सरकार जनतेची आर्थिक पिळवणूक करीत असून दिवसेंदिवस महागाईचा भस्मासूर वाढत असल्याने गोरगरीब व सामान्य जनता बेजार झाली आहे. बेजार झालेल्या नागरिकांचा आवाज शासन दरबारी पोहोचविण्यासाठी शुक्रवारी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चंद्रपुरात लॉलीपॉप मोर्चा काढण्यात आला.येथील गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून लॉलीपॉप मोर्चाची सुरूवात करण्यात आली. ‘नही चलेगी, नही चलेगी अच्छे दिनकी सरकार नही चलेगी’ अशा घोषणा देत निघालेला लॉलीपॉप मोर्चात जिल्ह्यातील व शहरातील हजारो कार्यकर्ते व बेजार झालेले नागरिक सहभागी झाले होते. केंद्र व राज्य सरकार महागाई थांबविण्यात अपयशी ठरत असून जनतेला जीवनावश्यक असलेल्या अन्नधान्य व वस्तुंचे, वीज बिल तसेच स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरची किंमती तिपटीने वाढवून गृहिणींचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ आणि पीक कर्जाच्या योजनेत सावळागोंधळ चालविल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या सर्व मागण्यांकडे लॉलीपॉप मोर्चाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.गांधी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या लॉलीपॉप मोर्चा दरम्यान ठिकठिकाणी लॉलीपॉपचे वितरण करण्यात आले. जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये ज्येष्ठ नेते अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, माजी आ. सुदर्शन निमकर, शहरध्यक्ष शशीकांत देशकर, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, मनपा गटनेते दीपक जयस्वाल, नगरसेवक मंगला आकरे, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे, हिराचंद बोरकुटे, डी.के. आरीकर, ज्योती रंगारी, सुनिल काळे, अ‍ॅड. गणेश गिरीधर, मुनाज शेख, संजय वैद्य, निलेश मानकर, प्रशांत चिप्पावार, पंकज पवार, विजयालक्ष्मी डोहे आदी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. २८ सप्टेंबर रोजी सावली येथे दुपारी १ वाजता तहसील कार्यालयावर लॉलीपॉप मोर्चा काढण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात टप्प्याटप्प्याने मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे गड्डमवार यांनी यावेळी सांगितले.