शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुसमधील रस्ते अतिक्रमणात गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

चंद्रपूर- घुग्घुस मुख्य रस्त्यावर सर्व्हीस रोडकरिता प्रावधान नसल्याने सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला व्यवसायिक लोकांनी आपली दुकाने थाटली आहे. त्यामुळे रात्रंदिवस चालत असलेल्या वाहतुकीमुळे व त्याच रस्त्यावर जड वाहने उभी राहत आहे. एकेरी वाहतुकीची व्यवस्था असली तरी सदर रस्त्यावर ट्रान्सपोर्टचे वर्कशॉप व कार्यालये थाटून आहेत. त्यामुळे ट्रकांच्या रांगा लागलेल्या असतात.

ठळक मुद्देसंडे अ‍ँकर। ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, नायब तहसीलदार कार्यालयासमोरच अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : घुग्घुस येथील चंद्रपूर-घुग्घुस-वणी रस्त्याबरोबरच पोलीस ठाणे ते बँक आफ इंडिया रस्त्यावरील महसूल विभागाच्या जमिनीवर व्यावसायिकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच गावातही व्यापाऱ्यांनी नाल्यांवर अतिक्रमण करून ठेवले आहे.चंद्रपूर- घुग्घुस मुख्य रस्त्यावर सर्व्हीस रोडकरिता प्रावधान नसल्याने सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला व्यवसायिक लोकांनी आपली दुकाने थाटली आहे. त्यामुळे रात्रंदिवस चालत असलेल्या वाहतुकीमुळे व त्याच रस्त्यावर जड वाहने उभी राहत आहे. एकेरी वाहतुकीची व्यवस्था असली तरी सदर रस्त्यावर ट्रान्सपोर्टचे वर्कशॉप व कार्यालये थाटून आहेत. त्यामुळे ट्रकांच्या रांगा लागलेल्या असतात. रस्ता एकेरी असला तरी ट्रकचालक येथून नियमाची पायमल्ली करून विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याने अनेकदा अपघात घडत आहेत.शिवाजी महाराज चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेकांनी दुकाने थाटली आहेत. त्यातही बसस्थानकाच्या बाजूने वणी रस्त्यावर पेट्रोलपंपवरून विरुद्ध दिशेने वाहने टाकत असल्याने बसस्थानकासमोरही अपघात घडत आहेत. वाहन चालकांमध्ये नेहमी तू तू मै मै होत असते. मात्र वाहतूक शिपाई याकडे कानाडोळा करीत असतात.एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावरून विरुध्द दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शिवाजी चौक ते बॅँक आफ इंडीया रस्त्यावरील महसूल विभागाच्या जागेवर नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयासमोर अनेकांनी नियमबाह्य मोठमोठे शेड उभे केले आहेत. काहींनी व्यवसायासाठी तर काहींनी चक्क राजकीय पक्षाच्या कामकाजाकरिता हे अतिक्रमण केले आहे. घुग्घुस ग्रामपंचायतीने मुख्य मार्गावरील सांडपाणी वाहून नेणाºया नाल्या भूमिगत केल्या आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरण झाले, मात्र त्या भूमिगत नाल्यावर व्यावसायिक आपल्या दुकानाचे सामान नाल्यावर ठेवत असल्याने वाहनधारकांना रस्त्यावर आपली वाहने उभी करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरील रहदारीला अडचण निर्माण होत आहे. मात्र ग्रामपंचायत याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण