शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

रस्ते व नाल्यांची सर्वत्र बोंब

By admin | Updated: January 23, 2015 00:34 IST

चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकमतने ‘लोकमत जागर’ अभियान सुरू केले आहे.

रवी जवळे  चंद्रपूरचंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकमतने ‘लोकमत जागर’ अभियान सुरू केले आहे. या अभियानादरम्यान चंद्रपूर शहरातील नाल्यांची नियोजन अतिशय दुबळे असल्याचेच बहुतांश प्रभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. गौर तलाव प्रभाग मनपा हद्दीच्या शेवटच्या टोकावर वसले आहे. पूर्वी या परिसरात तलाव होता, त्यामुळे येथील नागरिकांच्या समस्या अधिक आहे. गौरी तलाव प्रभागात रस्ते आणि नाल्यांच्या समस्यांसोबतच अतिक्रमणाची समस्याही मोठी आहे. कचराकुंड्यांचा अभाव असल्याने घाणीचे साम्राज्यही दिसून येते.‘लोकमत’ चमूने गौरी तलाव प्रभागाचा फेरफटका मारला असता या प्रभागात अनेक समस्या दिसून आल्या. या प्रभागात अनेक ठिकाणी रस्ते उखडलेले दिसून आले. नालीचे बांधकाम काही ठिकाणीच झाले आहे. काही ठिकाणी तर नाल्याच नाही. ज्या ठिकाणी नालीचे बांधकाम केले आहे, तेथील नाल्या आता मोडकडीस आल्या आहेत. नालीचे दगड निघून काठ नालीत खचलेले आहे. सर्वपल्ली राधाकृष्ण चौक परिसरात रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, या परिसरात पार्र्कींगची सोय नसल्याने वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकदा वाहतुकीची कोंडीही होत असल्याचे नागरिक सांगतात. गौरी तलाव प्रभागातील गाडगेबाबा चौकात रस्त्याचे बांधकाम अजूनही झाले नसल्याचे दिसून आले. या परिसरातील सर्व रस्ते उखडलेले आहे. अनेक ठिकाणी तर रस्त्याच्या नावाखाली छोटीशी गल्लीच आहे. त्यामुळे या ठिकाणी आगीसारखी दुर्घटना घडली तर अग्निशमन वाहन जाणेही कठीण आहे. गाडगेबाबा चौकापासून जाणाऱ्या एका रस्त्यावर छोटेखानी पूल बांधला आहे. या पुलाला दोन भगदाड पडले आहेत. त्यामुळे येथे वाहने फसून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या सुमारास तर नवखा पादचारीही या ठिकाणी भगदाडाचा अंदाज न आल्याने पडू शकतो. याच रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब आहे. त्यामुळे कुठलेही चारचाकी वाहन या रस्त्यावरून जाऊ शकत नाही. सदर विद्युत खांब रस्त्यावरून हटविण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन गेली आहे. मात्र ती चक्क नालीतून टाकण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यासाठी पाईप लाईनचे असे नियोजन करणाऱ्यांचा केवळ संताप येतो. एखाद्यावेळी पाईपलाईन लिकेज झाली तर नागरिकांना दूषित पाणी मिळून त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. याच प्रभागातील बाबानगर परिसराचीदेखील अशीच अवस्था आहे. या ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम बहुदा नगरपालिका असतानाच केले असावे. नाल्याही जुन्याच आहे. त्यामुळे तेव्हा बांधलेले रस्ते आता पूर्णत: उखडले आहे. नाल्याही खचून रस्ताच नालीत गेल्याचा भास होतो. विशेष म्हणजे बाबानगर परिसरात कुचराकुंड्या कुठेच दिसल्या नाही. त्यामुळे रस्त्यावर वा मोकळ्या जागेत कचरा पडलेला दिसून आला. मोटघरे प्लॉट नावाची नवीन वस्ती तयार होत आहे. या ठिकाणी काही भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले आहे. मात्र काही भागातील लोकांना जाण्यायेण्याचा रस्ताच नाही. त्यांना वाहने अलिकडच्या रस्त्यावर ठेवून एका छोट्या गल्लीतून घर गाठावे लागते. याबाबत नागरिकांनी नगरसेविका लता साव यांना त्या ठिकाणी नेऊन या समस्येबाबत सांगितले. मात्र अजूनही नागरिकांना रस्ता मिळालेला नाही.