शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मुरुमाअभावी निर्माणाधीन रस्ते व पुलांची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST

जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठमोठ्या रस्त्यांची कामे सुरू असून रस्त्यांचे रुंदीकरण सुरू असल्यामुळे जुने पूल पाडून नवीन पुलांचे बांधकाम सुरू आहे. पुलांमध्ये किंवा रस्त्याच्या कामांमध्ये भरणा भरण्याकरिता मुरुमाची प्रचंड प्रमाणात आवश्यकता आहे; मात्र शासनाकडून मुरुम काढण्याचे परवाने देण्यात येत नसल्यामुळे पावसाळ्यापूर्वी निर्माणाधीन पुलांची कामे होणे शक्य नसल्याचे चित्र आहे. असे झाल्यास पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटू शकतो.

आशिष देरकर लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : गेल्या ३ महिन्यांपासून शासनाकडून मुरुम काढण्याचे परवाने देण्यात न आल्याने पूल व रस्ते बांधकाम प्रभावित झाले आहे. मुरुम नसल्यामुळे कंत्राटदारांना कामे आरामशीर करण्याची संधी मिळाली असून जनतेचे मात्र हाल सुरू आहेत.जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठमोठ्या रस्त्यांची कामे सुरू असून रस्त्यांचे रुंदीकरण सुरू असल्यामुळे जुने पूल पाडून नवीन पुलांचे बांधकाम सुरू आहे. पुलांमध्ये किंवा रस्त्याच्या कामांमध्ये भरणा भरण्याकरिता मुरुमाची प्रचंड प्रमाणात आवश्यकता आहे; मात्र शासनाकडून मुरुम काढण्याचे परवाने देण्यात येत नसल्यामुळे पावसाळ्यापूर्वी निर्माणाधीन पुलांची कामे होणे शक्य नसल्याचे चित्र आहे. असे झाल्यास पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटू शकतो. त्यामुळे शासनाने मुरूम काढण्याची तात्पुरती परवानगी देऊन कामांना गती देण्याची आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी गौण खनिजाचे अवैध उत्खनन व चोरी होत असल्यामुळे शासनाने नियम कठोर केले आहेत. कंत्राटदरांकडून बांधकामात अवैध वाहतूक व गौण खनिजाची चोरी करताना आढळल्यास महसूल विभागाचे अधिकारी वाहन जप्तीची कारवाई करून प्रचंड शुल्क आकारतात. त्यामुळे चोरीवर आळा बसला आहे; मात्र रीतसर परवानगी देऊन मुरूम उपलब्ध करून दिल्यास पुल व रस्त्यांच्या कामाला गती येईल. मात्र शासनाचे धोरणच शासकीय कामात अडसर ठरत असल्याचे दिसून येत आहे.

तात्पुरते परवाने द्यावेशासनाकडून ज्या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे किंवा ज्या रस्ते व पुलांची कामे सुरू आहेत अशा कंत्राटदाराला त्या रस्त्याकरिता त्याचे अंदाजपत्रक व कार्यारंभ आदेश तपासून तात्पुरता परवाना देणे आवश्यक आहे. रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल.

अपघातात वाढजिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने वर्दळीकरिता रस्ते चांगले नाहीत. त्यामुळे अनेक अपघात घडले असून अपघातांवर आळा घालण्यासाठी रस्त्यांची कामे तत्काळ होणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग