लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रस्ता सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या रस्ते सुरक्षा अभियानाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या हस्ते करण्यात आले. हे अभियान ७ मे पर्यंत चालणार आहे. यादरम्यान वाहतूक नियमांशी संबंधित जनजागृती करण्यात येणार आहे.रस्ता सुरक्षा अभियानात शालेय निबंध, स्पर्धा, वाहनचालकांची नेत्रतपासणी, स्कूल बसबाबत सुरक्षा मार्गदर्शन, वाहनांना रिफ्लेक्टर लावणे, ध्वनिप्रदूषण रोखणे, फॅन्सी नंबर प्लेट, विनापरवाना वाहन चालविणाºयांवर कारवाई मोहीम, ओव्हरलोड ताडपत्री, कार्यवाही मोहीम, डार्क ग्लास तपासणी, सीटबेल्ट तपासणी, हेल्मेट तपासणी, परावर्तिका पट्टी लावणे, हेडलाईट तपासणे, काळीपिवळी वाहन चालकांना मार्गदर्शन, एसटी वाहने चालकांना मार्गदर्शन, एसटी वाहनचालकांसाठी मार्गदर्शन, ट्रिपलसीट, दारू पिऊन वाहन चालविणाºया वाहनाची तपासणी मोहीम, ओव्हरलोड वाहतूक तपासणी मोहीम आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन ७ मे पर्यंत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखा व परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले.सोमवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर व वाहतूक नियंत्रण शाखा, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २९ वा रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रण कार्तिक सहारे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी केले. त्यांनी अपघाताची कारण व त्यावर करावयाची उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी रस्ता सुरक्षेबाबतचे सर्व नियम सांगून विशेष असे मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर व विभाग नियंत्रक कार्तिक सहरे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. आभार सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी एस. पी. फासे यांनी मानले.यावेळी पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा अभियानाला जिल्ह्यात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:52 IST
रस्ता सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या रस्ते सुरक्षा अभियानाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या हस्ते करण्यात आले.
रस्ता सुरक्षा अभियानाला जिल्ह्यात प्रारंभ
ठळक मुद्देनागरिकांत जनजागृती : ७ मेपर्यंत वाहतूक नियमांवर विविध उपक्रम राबविणार