शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

गोसेखुर्दच्या नहराचे काम रखडल्याने रस्ते प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:13 IST

सन १९८३ साली तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचे भूमिपूजन केले. तेव्हापासून आजपर्यंत ३४ वर्षांचा कालावधी होत असतानाही या प्रकल्पाच्या नहराचे काम अपूर्ण आहे.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता : कालव्यामुळे रस्त्याची दैना

आॅनलाईन लोकमतचिखलपरसोडी : सन १९८३ साली तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचे भूमिपूजन केले. तेव्हापासून आजपर्यंत ३४ वर्षांचा कालावधी होत असतानाही या प्रकल्पाच्या नहराचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे अनेक रस्ते प्रभावित झाले असून नहराचे काम पूर्ण झाल्यास काही मुख्य रस्ते नहरात जाणार आहेत.नागभीड तालुक्यातील काही गावांच्या संपर्कात उजव्या कालव्याचे काम आले आहे. तर त्याच कालव्याचे घोडाझरी नहरही काही गावांच्या मुख्य रस्त्याला छेदून समोर गेले आहे. हे नहर साधारणत: ६० फूट खोल व ४० फूट रुंद व पाण्याने भरून आहे. त्यामुळे पाण्याच्या दबावामुळे माती खचत जावून खिंडार पडले आहेत.अशीच अवस्था किरमीरी मेंढा या गावाला जाणाऱ्या रस्त्याची झाली आहे. या गावाच्या मुख्य रस्त्याला छेदून घोडाझरी शाखा कालव्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही टोकापर्यंत नहराचे खोदकाम झालेले आहे व नहर पाण्याने फुल्ल भरून असल्याने या रस्त्याच्या खालची जागा दलदलसारखी झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन एखादे जड वाहन गेले तर रस्त्यासोबत वाहनही कालव्यामध्ये जाते की काय, अशी अवस्था या रस्त्याच्या स्थितीवरून दिसून येते. उंच गवत व वळणदार रस्त्यामुळे नहराचे झालेले खोदकाम जवळ गेल्याशिवाय नजरेस पडत नाही. त्यामुळे केव्हाही अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी सूचना फलक लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.रस्त्यालगत असलेल्या नहराच्या समोरील गवत काढून धोक्याची सूचना देणारा फलक लावणे अगत्याचे आहे. तसेच रखडलेले काम लवकर पूर्ण करून त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना व्हावा.- मनोहर चौधरी, सरपंच, ग्रामपंचायत किरमिरी मेंढा.ज्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे, त्या सर्व ठिकाणी सूचना फलक लावून रखडलेले काम लवकरच सुरू केले जाईल.- व्ही.व्ही. ओचावार, शाखा अभियंता, नागभीड