शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मूलमध्ये आरओ मशीनद्वारे शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:23 IST

तालुक्यातील उथळपेठ, चिंचाळा गावानंतर आता मूल शहरात देखील आरओ मशीनव्दारे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा पहिला प्रकल्प राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु केला आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पाच रूपयात मिळणार २० लिटर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील उथळपेठ, चिंचाळा गावानंतर आता मूल शहरात देखील आरओ मशीनव्दारे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा पहिला प्रकल्प राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु केला आहे. लवकरच मूल शहरात १० आरओ मशीन सुरु होणार असून पाच रुपयामध्ये २० लिटर पाणी मिळणार आहे. हा उपक्रम बचत गटांमार्फत सुरु ठेवण्याचा मानस पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.शहरातील २८ कोटींच्या २४ तास पाणी पुरवठ्याच्या योजनेला आकार येत असतानाच उपलब्ध असणाऱ्या जलसाठ्यातून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी शहरात पहिल्या आरओ मशीनद्वारे पाणी पुरवठ्याचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. शहरातील सर्व उपलब्ध जलसाठ्याचा वापर शुद्ध पाण्यासाठी करण्यात यावा, असे वॉर्ड नं. चार मधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील आरओ मशीनचे उद्घाटन करताना पालकमंत्र्यांनी सांगितले.आयटीसी कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून हा आरओ प्रकल्प उभा करण्यात आला. मूलमध्ये नागपूर सारखी २४ तास पाणी पुरवठा योजना सुरु होणार आहे. त्या जोडीला ही आरओ मशीनची सुविधा सध्या उपलब्ध झाली आहे. यात ५ रुपयामध्ये २० लिटर शुद्ध पाणी दिले जाणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरुनुले, नंदू रणदिवे, संगीता वाळके, विद्या बोबाडे, रेखाताई येरणे, मनीषा गांडलेवार आदी उपस्थित होते.प्रयोग यशस्वी झाल्यास आरओ मशीन वाढविणारमूल येथील अभिनव प्रयोग असून महिला बचत गट या शुद्ध पाण्याच्या एटीएमला पुढे सुरु ठेवणार आहेत. मोफत दिलेल्या सुविधेला महत्त्व राहत नाही. पाणी हे जीवन असून रोजच्या आयुष्यात त्याचे महत्व आहे. त्यामुळे बचत गट हे यापुढे ही यंत्रणा चालवेल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरात अधिक नऊ आरओ मशीन सुरु करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.