शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

कोरोनाच्या महामारीत राईसमिल संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

देशभरातून तांदूळ निर्यातीत १५ टक्के वाटा पूर्व विदर्भाचा आहे. तेथे धानातून तांदूळ निर्माण केले जाते. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचांदूर, चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरातील चुल धान पिकांवर पेटते. जयश्रीराम एचएमटी, सोनालिका, पारस, आयआर ३६ या धानाची लागवड परिसरात केली जाते.

ठळक मुद्देकर्जाचा डोंगर वाढला : वीज बिलाने व्यवसाय डबघाईस

रवी रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : शेतकऱ्यांना चांगले उत्पादन झाले तर राईसमिलला चांगले दिवस येतात. परंतु कोरोनाच्या महामारीत सध्या राईसमिल संकटात सापडल्या आहे. राईस मिल मालकांवर कर्जाचे डोंगर वाढत असून अवाढव्य वीज बिलाने व्यवसाय डबघाईस आला आहे.देशभरातून तांदूळ निर्यातीत १५ टक्के वाटा पूर्व विदर्भाचा आहे. तेथे धानातून तांदूळ निर्माण केले जाते. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचांदूर, चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरातील चुल धान पिकांवर पेटते. जयश्रीराम एचएमटी, सोनालिका, पारस, आयआर ३६ या धानाची लागवड परिसरात केली जाते.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने राईसमिल आहेत. यापैकी ब्रम्हपुरी नागभीड, सिंदेवाही, मूल या पट्ट्यात राईस मिलची संख्या सर्वाधिक आहे. मागील पाच महिन्यांपासून कोरोनाचे वादळ आल्याने याचा फटका राईसमिल व्यवसायाला बसला आहे. मजूर वर्गाशिवाय कोणत्याही व्यवसायाचा विकास होत नाही. कोरोनाच्या महामारीने सुरूवातीला व दरम्यानच्या काळात मजूर वर्ग बाहेर गेल्याने भात उत्पादनावर काही काळ मोठा फरक पडला. त्याचप्रमाणे शासनाने मोफत दरात मजुरवर्गांना तांदूळ, गहू दिल्यामुळे याचाही फटका या उद्योगाला बसला. कोरोनाच्या संकटात राईसमिल जीवनावश्यक वर्गात येत असल्याने सुरू होत्या. परंतु उत्पादित झालेला माल मात्र लॉकडाऊनमुळे बाहेर गेलाच नसल्याने राईसमिल मालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. राईसमिल उद्योगाचे भवितव्य उत्पादित झालेल्या मालाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळामध्ये झालेल्या आर्थिक कोंडीमुळे व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे.कुकुस स्थिरावला, मात्र कोंढ्याचे भाव घसरलेलॉकडाऊ नच्या काळात कुकुसाला भाव होता. तो आजही कायम आहे. कुकुसाला स्थानिक नागरिकांकडूनही मोठी मागणी आहे. नागपूर, आंध्रप्रदेश व छत्तीसगढ येथे ऑइस फ्लॅक्टीमध्ये कुकुसची मागणी आहे. कोंढ्याचे दर मात्र, घसरले आहे. कोढ्यांची मागणी करणारे पॉवर प्लॅन्ट लॉकडाऊनमध्ये बंद होते. बहुतांश पॉवर प्लॅन्टची मुदत वाढवून न दिल्याने कोंढ्याच्या मागणीत घसरण झाली.त्याचाही फटका या उद्योगाला बसला आहे.लॉकडाऊ नमुळे निर्यातीवरही परिणामजिल्ह्यातील तांदूळ देशात वितरीत होते. परंतु सततच्या लॉकडाऊ नमुळे निर्यातीवर मोठा परिणाम पडला आहे. सध्या १५ ते २० टक्क््यांवर हा व्यवसाय आला आहे. उष्ण तांदूळ ७ ते ८ विदेशात जातो. त्यावरही परिणाम पडला आहे.बँकांनी २० टक्के कॅश के्रटीड वाढवून दिली आहे. परंतु ते उपयोगाचे नाही. त्याऐवजी व्याजाचा दर कमी केल्यास व्यवसायात वृध्दी होऊ शकते. तशी विनंती राईसमिल असोशिएनकडून करण्यात आली.