शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

हातसळीद्वारे सुरू केला तांदळाचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:27 IST

नांदेड येथील आम्रपाली बचत गटाच्या महिलांनी हातसळीद्वारे दर्जेदार तांदूळाचा व्यवसाय सुरु केला असून नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देशुभ वर्तमान : नांदेड येथील आम्रपाली बचतगटाचे धाडस

संजय अगडे।ऑनलाईन लोकमततळोधी (बा.) : नांदेड येथील आम्रपाली बचत गटाच्या महिलांनी हातसळीद्वारे दर्जेदार तांदूळाचा व्यवसाय सुरु केला असून नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या. शिवाय, मार्गदर्शन शिबिरातून योजनांचे महत्त्व समजावून सांगितले जात आहे. मात्र ग्रामीण भागातील महिला स्वयंरोजगारासाठी पुढे येत नाही. दरम्यान, शासनाकडून बचतगटाची माहिती मिळाल्याने नांदेड येथे काही दिवसांपूर्वी आम्रपाली बचतगटाची स्थापना करण्यात आली. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांना उत्तम प्रकारचा मार्गदर्शन व्हावा याकरिता दिशा लोकसंचालीत केंद्राने या बचतटाला मार्गदर्शन केले. एचएमटी धानाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या गावातील आम्रपाली महिला बचत गटाच्या माध्यमातून हातसळीद्वारे उत्तम तांदूळ विक्री व्यवसाय महिलांनी सुरू केला. हातसळीद्वारे धानाला उखळात घेवून मुसळाने हातसळीचा तांदूळ तयार केला जातो. या तांदळापासून उत्तम प्रकारचे जीवनसत्व मिळते. हे तांदूळ मानवी जीवनाला अतिशय लाभदायक असल्यामुळे सातत्याने मागणी वाढत आहे. आम्रपाली महिला बचतगटात अध्यक्ष सिंधू लक्ष्मण रामटेके, कुंदाबाई किशोर शेंडे, शेंडे, राजश्री हेमलता रामटेके, मंगला, जिजा खोब्रागडे, संगीता शेंडे, यशोधरा वासनिक, ललीता खेमचंद गेडाम, जिजा वासनिक, उषा माणिक रामटेके, भागरथा रामटेके, निर्मला शामकुळे, संध्या आदेश भोयर, अर्पिता हिरालाल रामटेके, कौशल्या खोब्रागडे, सुमन खोब्रागडे आदींचा समावेश आहे.