शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
2
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
3
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
4
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
5
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
6
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
7
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
8
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
9
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
10
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
11
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
12
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
13
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
14
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
15
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
16
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
17
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
18
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
19
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
20
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत

ताडोबातील वाघांच्या जीवनशैलीवर होणार संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:41 IST

मानव-वन्यजीव संघर्ष, कमी होणारे जंगल, जंगलातील मानवी हस्तक्षेप आणि वाढणारे वाघ या सर्व प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी वाघांच्या जीवनशैलीचा अभ्यास देहरादून वाईल्ड लाईफ इस्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतर्फे करण्यात येत आहे.

ठळक मुद्देवाईल्डलाईफ इस्टिट्युट संस्था विदर्भातील सात अभायारण्याचा करणार अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्ष, कमी होणारे जंगल, जंगलातील मानवी हस्तक्षेप आणि वाढणारे वाघ या सर्व प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी ताडोबातील व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या जीवनशैलीचा अभ्यास देहरादून वाईल्ड लाईफ इस्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतर्फे करण्यात येत आहे.विदर्भातील ताडोबा, मेळघाट, बोर, नवेगाव, पेंच, नागझिरा आणि उमरेड-करांडला या व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या जीवनशैलीचा अभ्यास करुन संशोधन करण्यात येत आहे. चंद्रपुरात ताडोबा येथील अभायारण्य देशातच नाहीतर जगात प्रसिद्ध आहे. हमखास व्याघ्रदर्शन अशी प्रचिती ताडोबा अभायारण्यात आहे. या प्रकल्पात वाघांचा प्रजनन दर अधिक आहे. ताडोबाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात ८५ वाघ आणि बछडे वास्तव्यास आहेत.वाघ सात-आठ वर्षाचा झाला की तो आपला स्वतंत्र अधिवास तयार करतो. हा अधिवास तयार करताना तिथे आधीपासून असलेल्या वयोवृध्द वाघाला हाकलून लावतो. हा प्रकार अलिकडच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढला. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. एका क्षेत्रात दोन वाघ राहू शकत नाही. मात्र सततच्या जंगलतोडीमुळे वाघाच्या तुलनेत जंगलाचे प्रमाण कमी पडत आहे. त्यामुळे एकाला बाहेर पडावे लागते. अशा स्थितीत तो जंगलाशेजारी असलेल्या गावाजवळ आश्रय घेतो. वृध्दत्वामुळे शिकार करणे अवघड होत असल्याने तो गावातील गुरांची शिकार, जंगलात जाणाऱ्या माणसांवर हल्ले करतो. जंगलाबाहेर पडणाऱ्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष चंद्रपूर जिल्ह्यात मोठा प्रमाणात आहे. तेंदू पाने, बांबू, जळाऊ लाकडे आणण्यासाठी जंगलात घुसखोरी करणाऱ्या माणसांवर हल्ले होतात. या सर्व समस्यांवर उपाय शोधण्यासाठी वाघांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात येत असून देहरादून येथील वाईल्डलाईफ इस्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेसोबत या संदर्भात वनविभागाचा करार झाला आहे. वाघांच्या अभ्यासाचा अहवाल येत्या काही महिन्यातच सर्व व्याघ्र प्रकल्पांना सोपविला जाणार आहे. त्यामुळे वाघांचे संगोपन, त्यांची हाताळणी सुरक्षा यांचे नियोजन शक्य होणार आहे.

टॅग्स :Tigerवाघ