बल्लारपूर येथे १७ सप्टेंबरला शिबिर : गरजू दिव्यांगांना कृत्रिम अंग पुरविणारचंद्रपूर : बल्लारपूर येथे १७ सप्टेंबर रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी होणाऱ्या शिबिराचा आढावा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. या बैठकीत पालकमंत्र्यांनी शिबिराअगोदर आणि शिबिरातील व्यवस्थेबाबत विविध सूचना केल्या.यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा आरोग्?य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, नागरिकांची गैरसोय होऊ नये. यासाठी सर्व व्यवस्था चांगली होण्यासाठी प्रयत्न करावे. विविध कामांसाठी समिती गठित करावी, शासनाला आवश्यक असलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मदत पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींना आणण्याची सोय कराचंद्रपूर : शिबिर यशस्वी होण्यासाठी दिव्यांग व्यक्तींची यादी तयार करून तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून अशा व्यक्तींना या शिबिरात आणण्याची व्यवस्था करावी, व खाणपाणासाठी खाद्यान्नाची कीट तयार करण्याच्या सूचना ना. मुनगगंटीवार यांनी बैठकीत दिल्या.जिल्हा प्रशासनातर्फे बल्लारपूर येथील संत तुकाराम सभागृह, बालाजी वार्ड येथे हे शिबिर आयोजित केले आहे. ४० टक्याच्यावर दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींची शिबिरात तपासणी करून त्यांना आवश्यक असणारी कृत्रिम साधने तीन महिन्यात वाटप करण्यात येणार आहेत.दिव्यांग व्यक्तींनी शिबिरस्थळी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, शिबिराच्या लाभासाठी किमान ४० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, १५ हजार रुपए मासिक उत्पन्नाचा दाखला, आश्रितांच्या बाबतीत वडिल किंवा पालकांचे मासिक २० हजार रूपयांचा उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र सोबत आणावे. (स्थानिक प्रतिनिधी)पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजनचंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम, सहायक उत्पादन केंद्र एलिस्को तसेच भारत सरकारच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क मदत व संयंत्रांचे वितरण करण्याच्या दृष्टिने विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात तपासणी अखेर पात्र ठरणा-या दिव्?यांग बांधवांना तिन महिन्यानंतर संयंत्रांचे वितरण करण्?यात येणार आहे. शिबीराला नेताजी हरीचंदन, हेमंत नायर, विमल ओबेरॉय, अनुप सेंगर हे अपंग पुनर्वसन क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
पालकमंत्र्यांकडून दिव्यांग व्यक्तींसाठीच्या शिबिराचा आढावा
By admin | Updated: September 13, 2016 00:39 IST