शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले खरीप पिकांचे पुन्हा मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

सध्या सोयाबीन पिकाची कापणी सर्वत्र सुरू असून कापल्यानंतर वाळण्यासाठी हे पीक शेतात ठेवले जाते. नंतर एकत्र करून त्याचा ढीग तयार करण्यात येतो. हे सर्व सुरू असतानाच ८ ऑक्टोबरपासून वादळासह जोरदार पावसाच्या सरी येत आहेत. शनिवारीला रात्री जोरदार विजगर्जनेसह वादळी पाऊस आला. या पावसामुळे बऱ्याच गावातील शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकापूस, सोयाबीन व धानालाही फटका : शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस आहे. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, धान या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच रविवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावली. पुन्हा पिकांना फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारने या नुकसानीची नोंद घ्यावी, अशी मागणी या सर्व गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.सध्या सोयाबीन पिकाची कापणी सर्वत्र सुरू असून कापल्यानंतर वाळण्यासाठी हे पीक शेतात ठेवले जाते. नंतर एकत्र करून त्याचा ढीग तयार करण्यात येतो. हे सर्व सुरू असतानाच ८ ऑक्टोबरपासून वादळासह जोरदार पावसाच्या सरी येत आहेत. शनिवारीला रात्री जोरदार विजगर्जनेसह वादळी पाऊस आला. या पावसामुळे बऱ्याच गावातील शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे सोयाबीन, धान व कापूस पिकाला जोरदार फटका बसला. धान तर शेतातच भूईसपाट झाले. चंद्रपूरसह, राजुरा, कोरपना, सिंदेवाही, मूल, भद्रावती, वरोरा आदी तालुक्यातही हा पाऊस झाला.राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, चिंचोली, बबापूर, साखरी, मानोली, वरोडा, गोयेगाव, अंतरगाव, आर्वी, वरुर रोड, टेंबुरवाही, तुलाना, बेरडी, सिर्सी, चिचबोडी, भेंडाळा, भुरकुंडा, भेदोडा, साखरवाही, पाचगाव, कापनगाव यासह अनेक गावात जोरदार पाऊस आला. त्यात कापूस, व व धान पिकाचे मोठे नुकसान झाले. धान पीक शेतात झोपून गेल्याचे दिसत आहे. सोयाबीन कापणी झाल्यानंतर पाऊस आल्याने शेतकºयांनी दुसऱ्या दिवशी वाळण्यासाठी ते परतवून ठेवले. मात्र त्यानंतर पुन्हा जोरदार पाऊस आल्याने आता या सोयाबीनला कोंब फुटून संपूर्ण पीक हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भरपाई द्यावीशेतकरी आधीच चिंतेत असताना आता परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता शासनाने शेतकºयांच्या या नुकसानीची दखल घ्यावी आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती