शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्ती वयवाढीचा निर्णय म्हणजे बेरोजगारांची थट्टाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:08 IST

शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवय ५८ वरुन ६० करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. मात्र पूर्वीच शासकीय नोकरभरती अल्प प्रमाणात सुरू आहे. आता या निर्णयाने पुन्हा भरती होणार नाही. परिणामी बेरोजगारांची संख्या वाढेल.

ठळक मुद्देसोशल मीडियावर नाराजी : पुन्हा बेरोजगारी वाढणार

परिमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवय ५८ वरुन ६० करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. मात्र पूर्वीच शासकीय नोकरभरती अल्प प्रमाणात सुरू आहे. आता या निर्णयाने पुन्हा भरती होणार नाही. परिणामी बेरोजगारांची संख्या वाढेल. त्यामुळे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्तीचा वय वाढीचा निर्णय म्हणेज बेरोजगारांची थट्टा आहे. अशा प्रतिक्रीया बेरोजगारांकडून व्यक्त होत आहेत.दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाकडून उपाययोजना होणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांपासून शासनाने नोकर भरती बंद केली होती. त्यानंतर नोकरभरती सुरु केली. त्यातही कंत्राटी भरती घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयाचा विरोध सुरु असतानाच पुन्हा शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणी गृहीत धरुन सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांपासून ६० वर्ष करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन वर्षात ज्या विभागातील कर्मचारी सेवानिवृत्त होणार होते ते पुढील दोन वर्ष पुन्हा सेवानिवृत्त होणार नाही.त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढणार असल्याने हा निर्णय लाखो सुशिक्षित बेकार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळणारा असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.सेवानिवृत्तीनंतरही घेतात सेवेतदरवर्षी विविध विभागातील अंदाजे सुमारे तीन टक्के म्हणजेच जवळपास एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी सेवानिवृत्त होतात. मात्र सेवानिवृत्तीच्या वयात वाढ केल्यामुळे जागा रिक्त होणार नाही. परिणामी पुन्हा बेरोजगारांची संख्या वाढणार आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांंना पुन्हा शासकीय सेवेत घेण्यात येते. त्यामुळे ती पदे रिक्त होतच नाही. परिणामी अनेकांमध्ये पात्रता असूनही वंचित राहावे लागत आहे.खटुआ समितीचा विरोधशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली खटुआ समिती नेमण्यात आली होती. मात्र या समितीमध्ये केवळ सेवानिवृत्त तसेच कार्यकारी अधिकारी यांचाच भरणा होता. परंतु यामध्ये कोणत्याही प्रकाचे अर्थतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व अन्य विषयातील तज्ज्ञांचा समावेश नव्हता. त्यामुळे कर्मचाºयांना स्वत:च्या फायद्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रियाही उमटत आहेत.खुली पदभरतीही अन्यायकारकसरकारने समांतर पद्धतीने खासगी क्षेत्रातील मुलांची कोणतीही परीक्षा न घेता सरळ दिल्लीत सहसचिव पदावर नियुक्ती भरती केली. आता निवृत्तीवय वाढवले. सरकारच्या अशा निर्णयामुळे बेरोजगार शासकीय नोकरीसाठी पात्र असतानासुद्धा त्यांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी बेरोजगारी वाढत आहे. नोकरभरती करताना शासनाच्या नियमातच स्पष्टता नसल्याने बेरोजगारांचा दरवर्षी हिरमोड होत आहे.उतरत्या वयात उत्साह कमीशासकीय कामाला गती देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. मात्र सेवानिवृत्त कर्मचाºयांचे वय वाढवून ६० करण्यात आले. उतरत्या वयात काम करण्याचा उत्साह कमी असतो. त्याऊलट युवकांमध्ये कामाबद्दल उत्साह असतो. त्यामुळे हा निर्णय चुकीचा असल्याच्या प्रतिक्रिया बेरोजगारांकडून व्यक्त होत आहे. पूर्वीच शासकीय कार्यालये लेटलतिफच्या कारभारामुळे चर्चेत असते. त्यातही डिजिटल युगात सर्व कामे स्मार्ट व्हावे, अशी अपेक्षा आहे. पण, ६० वर्षीयांच्या हातात कामाची दोरी दिेल्यास कशी गती राहिल, हा प्रश्न निर्माण झाला आहे.