शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तात्काळ सोडवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 23:10 IST

वेकोलिमुळे बाधित झालेल्या गावांच्या व प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजुरांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या वेकोलिने तात्काळ सोडवून तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करावा, असे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्रे यांनी वेकोलि प्रकल्पग्रस्तांची सामूहिक सभेमध्ये दिले.

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्तांची सभा : अति. जिल्हाधिकाऱ्यांचे वेकोलिला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलिमुळे बाधित झालेल्या गावांच्या व प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजुरांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या वेकोलिने तात्काळ सोडवून तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करावा, असे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्रे यांनी वेकोलि प्रकल्पग्रस्तांची सामूहिक सभेमध्ये दिले.भटाळी ओपन कॉस्ट माईन्समुळे बाधित शेतजमीन संपादित करून त्यांना आजच्या भावाने मोबदला व सोयीसुविधा द्याव्या, भटाडी खदान जडवाहनांना ताडोबा रोडावर धावणे बंद करावे, त्याच्याकरिता स्वतंत्र रस्त्याचा वापर करावा, नदीपात्राचा गैरवापर टाळावा, भटाळी गावाला लागून खदानी काम सुरू आहे त्यामुळे सदर गाव धोक्यात आहे त्याचे पुनर्वसन तात्काळ युद्धपातळीवर करण्यात यावे, पद्मापूर गावाचे भूसंपादन वेकोलिने १९९० ते ९७ दरम्यान केले होते. परंतु, येथील बाधितांना मालमत्तेचा पूर्ण मोबदला अजूनही दिला नाही. त्यामुळे वहिवाटीतील जागेचा मोबदला द्यावा, सोल्याशियम ३० टक्के देण्यात यावे, गावातील इमारतीचे मोजमाप मुल्यांकन सन १९९०-९१ मध्ये झाले व मोबदला वाटप १९९७ मध्ये केला. या मधील सहा वर्षानंतर मोबदला दिला तेव्हा त्या सहा वर्षाचे व्याज दरसाल दरशेकडा १२ टक्के प्रमाणे देण्यात यावे, सरकारी मालमत्ता रिसर्वे ७० लाख मुल्याची सोडून दिली ती देण्यात यावी, सरकारी तलाव वेकोलिने ताब्यात घेतला तो बांधून देण्यात यावा, अशा सुचना यावेळी वेकोलिला देण्यात आल्या.दरम्यान पद्मापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेले किटाळी व मसाळा तुकूम पुनर्वसन करण्यात आले. यावर चर्चा करण्यात आली. भटाळी गावाचे पुनर्वसनची जबाबदारी येथील सरपंचानी स्वीकारली तर सिन्हाळा मसाळा (बु) नवेगाव या गावाचे पुनर्वसनाची जबाबदारी येथील सभेला उपस्थित गावकºयांनी सभेत स्वीकारली. सभेला प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष के. जी. साव, उपाध्यक्ष कदीर शेख, सरदार काटकर यांच्यासह भटाळी, किटाळी, पद्मापूर, मसाळा, सिन्हाळा (बु), येथील नागरिक उपस्थित होते.