शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पूरबुडित क्षेत्रातील रहिवास बेतू शकतो जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:00 IST

मागील काही दिवसांपासून चंद्रपूरसह संपूर्ण जिल्ह्यातच संततधार पाऊस बरसत आहे. इरई धरणही ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत आहे. चंद्रपूर शहरातून इरई आणि झरपट या दोन नद्या वाहतात. या नदीकाठावर व पूरबुडित क्षेत्रात अनेक नागरिकांचा मागील अनेक वर्षांपासून रहिवास आहे.

ठळक मुद्देमनपा नोटीस देऊन मोकळी : प्रशासनाने पुनर्वसन करणे आवश्यक

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूरसह संपूर्ण जिल्ह्यातच संततधार पाऊस बरसत आहे. इरई धरणही ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत आहे. चंद्रपूर शहरातून इरई आणि झरपट या दोन नद्या वाहतात. या नदीकाठावर व पूरबुडित क्षेत्रात अनेक नागरिकांचा मागील अनेक वर्षांपासून रहिवास आहे. पाऊस सरासरी ओलांडून बरसला तर या नद्यांना पूर येऊन मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पूरबुडित क्षेत्रातील हा रहिवास जिवावरही बेतण्याची शक्यता निश्चितच आहे.नदीपात्रातच लोकांचा रहिवास असल्यामुळे त्यांना तिथून हटविण्यासाठी मनपा अतिक्रमण करणाऱ्यांना दरवर्षी नोटीस बजावते. यावर्षीही त्यांना नोटीस दिली आहे. मात्र या नोटीसला न जुमानता नदीपात्रात त्यांचा रहिवास कायम आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेनेही नोटीस बजावण्यापलिकडे ठोस काहीच केले नाही. पूरपरिस्थिती उदभवल्यास नागरिकांचे नुकसान व महापालिकेची धावाधाव अटळ आहे. चंद्रपूर शहरातून इरई व झरपट या दोन नद्या वाहतात. झरपट नदीची तर डोळ्यादेखत दूरवस्था होत असतानाही प्रशासन नदीच्या दूरवस्थेला थांबवू शकले नाही. इरई नदी वाहती आहे. चंद्रपूरकरांना पिण्याची पाणीही या नदीतून मिळते. चंद्रपूरची तहान भागविणारी नदी असतानाही या नदीकडे नागरिकांनी दुर्लक्ष करणे सुरू केले. वेकोलिचे महाकाय ढिगारे व नागरिकांच्या अतिक्रमणामुळे व कारखान्यांच्या रसायनमिश्रिम पाण्यामुळे ही नदी अरुंद व दूषित झाली. परिणामी पावसाळ्यात नदीचे पाणी थोपून चंद्रपूरकरांना दरवर्षी बॅक वॉटरचा फटका बसू लागला. या पूरपरिस्थितीमुळे अनेकवेळा अतोनात नुकसान झाले आहे. दोन वर्षांपूर्वी इरई नदीचे खोलीकरण करण्यात आले. मात्र हे काम निधीअभावी थांबविण्यात आले. इरई नदी खोलीकरणामुळे रुंद झाल्याने दोन वर्ष बॅक वॉटरचा सामना करावा लागला नाही. रहमतनगर, सिस्टर कॉलनी, नगिनाबाग परिसरात इरई नदीच्या पूरबुडित क्षेत्रातच नागरिकांनी घरे बांधून रहिवास सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी राहत आहेत. काहींनी तर चक्क नदीपात्रातच अतिक्रमण करून पक्की घरे बांधली आहेत. दुसरीकडे महाकाली वॉर्ड परिसरात झरपट नदीपात्रातही लोकांनी घरे बांधली आहे. या ठिकाणीदेखील त्यांचा रहिवास अनेक वर्षांपासून आहे. दोन दिवसांपूर्वी संततधार पावसामुळे या झोपड्यांच्या अगदी जवळ नदीचे पाणी आले होते. त्यानंतर पाऊस थांबल्याने त्यांचे धावाधाव टळली. त्यामुळे आता येथील नागरिकांचे पूनर्वसन करण्यासाठी प्रशासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे.ओव्हरबर्डनमुळे पूरपरिस्थितीचंद्रपूरलगत असलेल्या माना खाण परिसरात व इरई नदीपात्रालगत वेकोलिने मातीचे मोठमोठे ढिगारे तयार केले आहे. वर्षांनुवर्षापासून याच ठिकाणी माती टाकण्यात येत असल्यामुळे हे ओव्हरबर्डन महाकाय झाले आहे. या ओव्हरबर्डनमुळे पावसाळ्यात चंद्रपूरकरांना नेहमीच बॅकवॉटरचा सामना करावा लागला आहे. याही वर्षी जोरदार पाऊस झाला तर इरईचे पाणी थोपू शकते.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर