शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

‘स्मार्ट कार्ड’ काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:53 IST

ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवासासाठी स्मार्ट कॉर्ड योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र सदर कॉर्ड काढण्यासाठी जिल्ह्यातील चार आगारामध्ये जावे लागत आहे. मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने ज्येष्ठांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देतालुका मुख्यालयी वितरण करावे : ज्येष्ठ नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवासासाठी स्मार्ट कॉर्ड योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र सदर कॉर्ड काढण्यासाठी जिल्ह्यातील चार आगारामध्ये जावे लागत आहे. मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने ज्येष्ठांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्मार्ट कॉर्डचे वितरण तालुका मुख्यालयी करण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठांकडून होत आहे.ज्येष्ठ नागरिकांना आधार कॉर्ड दाखवून राज्य महामंडळातर्फे सवलतीच्या दरात प्रवास होत होता. परंतु, राज्य मार्गावरून प्रवास करताना एसटी महामंडळाची स्मार्ट पास अनिवार्य करण्यात आले आहे. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी चंद्रपूर, वरोरा, राजुरा व चिमूर बस आगारामध्ये ज्येष्ठांना स्वत: उपस्थित राहून स्वत:चा अंगठा देऊन कार्ड काढावे लागते. परंतु आगारामध्ये संतत लिंकफेल राहत असते. परिणामी ज्येष्ठांना रांगेत तासनतास ताडकळत उभे राहावे लागते. बहुतेक ज्येष्ठांना पुर्वी पायाचे घुटणे, कमर दुखणे, असा नानाविध आजार आहेत. त्यामुळे जेष्ठांना सतत रांगेत राहणे जळ जात असून भोवळ येऊन पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता आहे. सावली तालुक्यात १११ गावांचा समावेश आहे. बहुतेक गावांना आजही बैलबंडी, सायकल व पायदळ प्रवास करावा लागतो. तालुक्यापासून ५० किलोमीटर गावे आतमध्ये आहेत. तालुक्याच्या ठिकाणी येताना त्यांना १२ वाजतात.तेथून जिल्ह्याच्या ठिकाण गाठताना २ वाजतात. सतत लिंकफेलमुळे चार ते पाच चकरा माराव्या लागतात. तरीही काम पूर्ण होत नाही. या वयात शरीर ही साथ देत नाही .ये-जा करण्यात पैसा व वेळही वाया जातो. परत जाताना वाहतुकीचे साधन नाही. संपूर्ण परिसर जंगली भागाने वेढला आहे.त्यामुळे मानववन्यजीव संघर्षाच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुका मुख्यालयी स्मार्ट कार्डचे वितरण करावे, अशी मागणी सरपंच तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्ष उषा भोयर यांनी आगाराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.संतगाडगेबाबा संस्थेचे पालकमंत्र्यांना निवेदनबल्लारपूर : येथील ज्येष्ठांना स्मार्ट कार्डसाठी राजुरा आगारामध्ये जावे लागते. परिणामी त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बल्लारपूर बसस्थानकावर स्मार्टकार्डचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी श्री संत गाडगेबाबा महाराज जनसेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांना निवेदनातून केली आहे.