शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

२५० वसतिगृह कर्मचाऱ्यांचे मानधन पाच महिन्यांपासून रखडले

By admin | Updated: June 14, 2014 01:53 IST

राज्यात सन २००४ पासून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत वसतिगृह चालविण्यात येत आहे.

लखमापूर : राज्यात सन २००४ पासून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत वसतिगृह चालविण्यात येत आहे. या वसतिगृहात काम करणाऱ्या जिल्ह्यातील जवळपास २५० कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांपासूनचे मानधन अद्यापही थकीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण व शहरी भागात विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय एन.टी. आदी विद्यार्थ्यांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था या वस्तीगृहाअंतर्गत करण्यात येते. यासाठी ज्या संस्थाअंतर्गत हे वसतिगृह चालविण्यात येत आहे, त्या संस्थांना प्रती विद्यार्थी ९०० ते ९५० रुपये प्रती माह खर्च समाजकल्याण जिल्हा परिषद अंतर्गत देण्यात येतो. मात्र यामध्ये कमालीची अनियमितता असल्याचे समजते. जिल्ह्यात अशा प्रकारचे ६७ वसतिगृह असून यामध्ये २४ ते २८ विद्यार्थ्यांची प्रति वसतिगृह अशी संख्या आहे. विद्यार्थ्यांना राहण्याची उत्तम व्यवस्था, भोजन, मुलभूत सुविधा आणि नियंत्रणासाठी प्रत्येक वसतिगृहात एक अधिकारी, मदतनिस किंवा स्वयंपाकी ठेवण्यात आला आहे. गेल्या १० वर्षापासून हे कर्मचारी वसतिगृहात काम करीत असून त्यांना स्थायी करुन कायमस्वरूपी वेतन देण्यात येत नाही. मानधनावरच समाधान मानावे लागत आहे.यातही दर महिन्याला मानधन दिले जात नसल्याने कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण कसे पार पाडायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे उभा आहे. राज्यामध्ये साधारणता १० हजार ८०० कर्मचारी वसतीगृहात कार्यरत आहेत. काही जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मानधन दर महिन्याला वाटप करण्यात येत असताना चंद्रपूर जिल्ह्यात हे मानधन थकीत का ठेवले जाते, हा प्रश्न आहे.. सेवेत कायमस्वरूपी रुजू करुन शासननियमानुसार वेतन देण्यात यावे, यासाठी कर्मचारी संघटनेमार्फत आंदोलने करण्यात आली. त्यात महिन्याला मानधन वेळेवर द्यावे, अशीही मागणी होती. मात्र याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून कर्मचारी व संस्थाचालकांना वारंवार संबंधित कार्यालयापुढे चकरा मााव्या लागत आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे, शहरात राहण्याची भोजनाची मोफत सुविधा द्यावी, हा शासनाचा यामागचा उद्देश आहे. मात्र सदर वसतीगृहात रात्रदिवस विद्यार्थ्यांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोटाचे काय, असा सवाल कर्मचारी आता करीत आहे. एकीकडे महागाईने रुद्ररुप धारण केले आहे. तर दुसरीकडे तुंटपुज्या मानधनासाठी कर्मचाऱ्यांना पाच ते सहा महिन्यापासून प्रतीक्षा करावी लागत आहे. (वार्ताहर)