बल्लारपूर : शहरातील विविध शासकीय कार्यालय, निम शासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिवस कोविडचे नियम पाळून साजरा करण्यात आला. उपविभागीय कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या पटांगणावर उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण झाले. यावेळी तहसीलदार संजय राईंचवार, नायब तहसीलदार आर. एन. कुळसंगे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, अजय मेकलवार तसेच तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी व नागरिकांची यांची उपस्थिती होती.
नगर परिषद कार्यालय प्रांगणात नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी ध्वजारोहण करून सलामी दिली. ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्पिता वावरकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मेश्राम, डॉ. सुकेशनी कांबळे, आशा साळवे, आरोग्य सहायक सुरेश मेश्राम, गजानन खिरटकर उपस्थित होते. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून वसुंधरा व तंबाखू विरोधाची सर्वांना शपथ देण्यात आली. अग्निशमन यंत्र वापरण्याचे प्रात्यक्षिक अग्निशमन दलाच्या वतीने दाखविण्यात आले. अग्निशमन कार्यालय नगर परिषदेच्या अग्निशमन कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी राष्ट्रीय ध्वज फडकवून सलामी दिली. कार्यक्रमात उपमुख्याधिकारी जयवंत काटकर, कार्यालयातील शाम दायमा, संजय हिबारे, वॉलीस मरे, जलील बेग, राजमल सरोज इत्यादींची उपस्थिती होती. पशुवैद्यकीय कार्यालय येथील तालुका पशुवैद्यकीय कार्यालयात उपमुख्याधिकारी जयवंत काटकर यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष रायपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमात प्रा. छाया भैसारे, अशोक क्षीरसागर, लोणारे व पशुवैद्यकीय दवाखान्याचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.