शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

स्मशानभूमीवरून पुन्हा वाद

By admin | Updated: February 3, 2016 00:57 IST

दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इरई नदीच्या तीरावर असलेल्या व सध्या बंद असलेल्या स्मशानभूमीच्या मुद्यावरून पुन्हा वाद उफाळून आला आहे.

कुलूप तोडून शव जाळले : उद्या चंद्रपूर बंदचे आवाहनचंद्रपूर : दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इरई नदीच्या तीरावर असलेल्या व सध्या बंद असलेल्या स्मशानभूमीच्या मुद्यावरून पुन्हा वाद उफाळून आला आहे. मंगळवारी या ठिकाणी कुलूप तोडून पोलीस बंदोबस्तात शव जाळण्यात आले. हा प्रकार दंडूकशाहीचा प्रत्यय देणारा असून याचा निषेध करीत ४ फेब्रुवारी रोजी काँग्रेसने चंद्रपूर बंदचे आवाहन केले आहे.चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव अ‍ॅड. अविनाश ठावरी, काँग्रेसचे नगरसेवक अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, प्रशांत दानव, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे सचिव वसंत मांढरे आदींनी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की चंद्रपूर शहराला लागून दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीत इरई नदीच्या तिरावर भगवान बालाजींचे मंदिर, समोरच हनुमानाचे मंदिर, बाजुला चर्च, कान्व्हेंट, गायत्री देवस्थान व इतर धार्मिक स्थळे आहेत. याच ठिकाणी पाच लॉन्स आहेत. याशिवाय अनेक शाळा-महाविद्यालये या भागात आलेले आहेत. या भागाला तिर्थस्थानाचे स्वरुप आलेले आहे. महाकाली यात्रेला येणारे भाविक सकाळी येथेच स्नान व पूर्जा अर्चना करून महाकालीच्या दर्शनाला जाण्याची प्रथा आहे. हा परिसर दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. दाताळा ग्रामपंचायतीची स्वतंत्र स्मशानभूमी असल्यामुळे इरई नदी तिरावरील स्मशानभूमीचा कोणी उपयोग करीत नाही. नगरसेवक डोडाणी यांनी त्यांच्याच कुटुंबातील किंवा नातेवाईकांचे प्रेत जाळण्यासाठी वर्ष, दोन वर्षातून एखाद्यावेळी या स्मशानभूमीचा मुद्दाम उपयोग केला आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी दाताळा ग्रामपंचायतीने आमसभेत ही स्मशानभूमी बंद करून बालोद्यान तयार करण्यात यावे, असा एकमुखी ठराव करून जिल्हा परिषदेकडे पाठविला. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने याला मंजुरीही दिली. असे असताना नगरसेवक डोडाणी आणि त्यांच्या पाचदहा हस्तकांनी दंडूकशाहीचा वापर करीत कुलूप तोडून पोलील संरक्षणामध्ये मुद्दाम आज या ठिकाणी प्रेत जाळण्यात आल्याचा आरोप अ‍ॅड. ठावरी, नागापुरे, पडवेकर आदींनी केला आहे. याच्या निषेधार्थ चंद्रपूर बंदचे आवाहन आहे.(शहर प्रतिनिधी)