शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

पीएफआरडीए' कायदा रद्द करा; जुनी पेन्शन सुरू करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 12:53 IST

Chandrapur : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : 'पीएफआरडीए' कायदा रद्द करा, सर्व कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, 'डीसीपीएस', 'एनपीएस'मधील जमा असलेले कर्मचारी, शिक्षकांचे १० टक्के अंशदान व्याजासह परत करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करा, यासह अन्य मागण्यांना घेऊन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने विविध आंदोलने केली. मात्र, तोडगा निघाला नसल्याने आता कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे.

प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने शासनाला अल्टीमेटम देण्यासाठी गुरुवारी (दि. २६) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये दुपारी २ वाजता लक्ष्यवेध निदर्शने करण्यात येणार आहे. या आंदोलनात विविध विभागाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. 

केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारीतील आणि सार्वजनिक संस्थांमधील खासगीकरण थांबवा, आठव्या केंद्रीय वेतन आयोगाचे त्वरित गठन करा या मागण्याही केल्या जाणार आहेत. जिल्हा तथा तालुकास्तरावरील सर्व राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, तसेच इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दीपक जेऊरकर, सरचिटणीस राजू धांडे, कार्याध्यक्ष संतोष अतकारे व अविनाश बोरगमवार, कोषाध्यक्ष श्रीकांत येवले यांनी केले आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर