शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

भाडे घ्या, पण चांगली सेवा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:57 PM

एसटी महामंडळाने नुकतीच १८ टक्के बस भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर दीड रुपये रूपये तिकीट वाढले आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी चांगली सेवा देण्यात स्पेशल अपयशी ठरत आहे. त्यामुळे भाडे घ्या पण, प्रवाशांना चांगल्या सोई द्या, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे.

ठळक मुद्देमागणी : प्रवाशांचा खासगी बसकडे कल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एसटी महामंडळाने नुकतीच १८ टक्के बस भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर दीड रुपये रूपये तिकीट वाढले आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी चांगली सेवा देण्यात स्पेशल अपयशी ठरत आहे. त्यामुळे भाडे घ्या पण, प्रवाशांना चांगल्या सोई द्या, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे.इंधनवाढ व कर्मचाऱ्यांची वेतन वाढ ही कारणे पुढे करीत तूट भरुन काढण्यासाठी एसटीमहामंडळाने नुकतीच तिकीट वाढ केली. मात्र त्यामानाने कोणत्याही सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाही. आजही अनेक बसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या तुटलेल्या आहेत, अनेक खुर्च्यांची सिटकव्हर फाटली आहेत, खर्राच्या पिचकाºयांनी बस लाल झालेली आहे. खिडक्याचे काच फुटले आहेत, प्रवासादरम्यान एसटीला धक्का मारण्याची बाब तर नित्याचीच आहे. अशा विविध समस्या एसटीबसमध्ये आढळून येतात. मात्र याची सोडवणूक करण्यासाठी महामंडळाने कधीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे प्रवासी आपोआपच खासगी वाहनाकडे वळत आहेत. परिणामी सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाणारे एसटीमहामंडळ दरवर्षी घाट्यात जात आहे. त्यातही आता तिकीट वाढविण्यात आली आहे. एकीकडे खासगी वाहनांमध्ये विविध प्रकारच्या सोयी-सुविधा देण्यात येत असूनसुद्धा २० ते २५ रुपयांनी तिकिट कमी आकारली जाते परिणामी प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येत आहे.बसमधील प्रथमोपचार पेटी गायबअनावधानाने बसचा अपघात झाल्यास प्रवाशांनावर प्राथमिक उपचार पेटी बसविण्यात आल्या होत्या. मात्र सद्याच्या परिस्थितीत प्रथमोपचार पेट्या गायब झाल्या आहेत. काहीच बसमध्ये या पेटी आढळून येतात. मात्र त्याठिकाणी कोणतेही साहित्य दिसत नाही.वासफाय सेवा ठप्पप्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तसेच बसमध्ये विना अडथळा नेट वापरण्यासाठी महामंडळाने एसटीमध्ये वुड डॉट काम या नावाने वायफास सेवा सुरु करण्यात आली. यामध्ये निवडक गाणे, कार्टुन, व्हिडिओ बघता येत होते. मात्र सदर वायफाससेवा बºयाचदा सुरु होत नसल्यांचे प्रवासी सांगतात.सौजन्य अभिवादन योजनेकडे दुर्लक्षमागील काही वर्षांपूर्वी महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सौजन्य अभिवादन योजना सुरु केली होती. या योजनेनुसार प्रवासी बसमध्ये बसल्यानंतर वाहक प्रवाशांना आपला परिचय करुन देतो. त्यानंतर तिकीटची रक्कम तसेच बसबद्दल माहिती देतो. मात्र सद्यास्थितीत ही योजना बंद झाल्याचे दिसून येत आहे.