साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तालुकास्तरावरील शाळा तसेच शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे जिल्ह्यात १५ पैकी तब्बल १४ पदे रिक्त असल्याने शिक्षण विभाग प्रभारींच्या भरोवश्यावर कारभार हाकत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कामे खोळंबली असून प्रशासन चालवायचे तरी कसे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुके आहे. तालुकानिहाय एक प्रमाणे जिल्ह्यात १५ गटशिक्षणाधिकारी असणे गरजेचे आहे विशेष म्हणजे, १५ ही पदे मंजूर आहे. मात्र पोंभूर्णा तालुका वगळता एकाही तालुक्यात गटशिक्षणाधिकारीच नसल्याचे समोर आले असून त्यांचा प्रभार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. दोन-दोन पदे सांभाळतांना शिक्षण विस्तार अधिकाºयांच्या नाकात दम येत आहे. मात्र ुवरिष्ठांनी दिलेली जबाबदारी कशी तरी पेलायची, यामुळेत ते मुकाट्याने त्रास सहन करीत आहेत. विशेष म्हणजे, काही तालुक्यांमध्ये विस्तार अधिकारीही नसून त्यांचा तसेच गटशिक्षणाधिकाºयांचा पदभार शालेय पोषण आहार अधिकाºयांकडे आहे. गट शिक्षणाधिकाºयांचा प्रभार सोपवितांना संबंधित अधिकारी बीएड् असणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून पदभार सोपवून काम करवून घेतल्या जात आहे. यामुळे शैक्षणिक कामे मागे पडत असून त्याचा शिक्षण विभागावर विपरित परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांत शाळा सुरु होणार असून शाळा, पटसंख्या, पुस्तक, गणवेश वितरण आदी शैक्षणिक कामे वाढणार आहे.इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी शाळा मागे पडत असल्याची ओरड सात्यत्याने होत आहे. अनेकवेळा या शाळा बंद पडतात की, काय अशीही भीती व्यक्त केली जात आहे. असे असतानाच शिक्षण विभागाचा कणा असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे १४ पद रिक्त ठेवण्यामागे नेमका उद्देश काय, हे मात्र कळायला मार्ग नाही.सुविधा उपलब्ध, देखरेख नाहीजिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये ई-लर्निंग, साऊंड सिस्टीम आदी सुुविधा उपलब्ध आहे. मात्र शाळांकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेले गटशिक्षणाधिकारीच नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिक्त पदांमुळे आलेला दिवस काढण्याचे काम शिक्षण विभागात सध्या सुरू आहे.
जिल्ह्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांचा भार प्रभारींच्या भरवशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:31 IST
साईनाथ कुचनकार । लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : तालुकास्तरावरील शाळा तसेच शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे जिल्ह्यात १५ ...
जिल्ह्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांचा भार प्रभारींच्या भरवशावर
ठळक मुद्देकारभार चालणार तरी कसा?। १५ पैकी १४ तालुक्यात गटशिक्षणाधिकारीच नाही