शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

बनावट कागदपत्राद्वारे रजिस्ट्री

By admin | Updated: July 19, 2014 23:49 IST

राजुरा शहरातील सर्व्हे क्र. १४९, २१ या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून रजिस्ट्री केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी संभा कोवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमीन विक्री प्रकरण : आरोपीविरूद्ध गुन्हा दाखलराजुरा : राजुरा शहरातील सर्व्हे क्र. १४९, २१ या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून रजिस्ट्री केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी संभा कोवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपरोक्त सर्व्हेमध्ये चंद्रप्रकाश मेश्राम आणि शकुंतला मेश्राम यांची ०.६६ आर जमीन असून या दोघांच्याही बनावट स्वाक्षऱ्या करून राजुरा येथील रजिस्ट्री कार्यालयात खोटी रजिस्ट्री संभा कोवे यांनी केली. या प्रकरणात फिर्यादी चंद्रप्रकाश मेश्राम यांनी पोलिसात तक्रार केल्यामुळे संभा कोवे याच्याविरूद्ध भादंवि ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच राजुरा, चुनाळा, बामनवाडा येथेही अनेक आदिवासींची फसवणूक झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, याबाबत आयपीएस अधिकारी सुहेल शर्मा यांच्या कार्यकाळातच तक्रार करण्यात आली होती. परंतु हे प्रकरण थंडबस्त्यात होत्या. त्यानंतर पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. वरकरणी या प्रकरणात संभा कोवे हे गुंतल्याचे दिसत असले तरी यामागे बड्या लोकांचेही हात गुंतल्याची शक्यता आहे.खोटी रजिस्ट्री करून देणारे उपनिबंधक, एनएची परवानगी देणारे उपविभागीय अधिकारी हेसुद्धा या प्रकरणात दोषी असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. एकूणच या संपुर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)