शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनात होत आहे घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:31 IST

पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत सिंदेवाही तालुक्यात मोठी घट झाली आहे.

ठळक मुद्देचाराटंचाई कारणीभूत : गावोगावी दूध व शेणखताची चणचण

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत सिंदेवाही तालुक्यात मोठी घट झाली आहे. यासाठी जनावरांचा चारा व पाण्याची भेडसावणारी समस्या कारणीभूत ठरत आहे.शेतकरी व शेतमजुरांनी जनावरे मिळेल त्या भावात विक्रीचा सपाटा सुरू केल्याने गावरानी जनावरे कमी होत आहेत. भारतातील ९० टक्के जनता आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी शेतकरी बैलाचा वापर करायचे. शेतकºयांच्या जीवा भावाचा सखा म्हणून बैलाची ओळख होती. आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे यांत्रिक शेतीकडे शेतकरी वळत आहेत तर दुसरीकडे शेतमजुरांच्या मजुरीत पन्नास पटीने वाढ झाली आहे. परिणामी शेती करणे धान उत्पादक शेतकºयांना परवडणारे नाही. बैलाची, गाय व म्हैस यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पूर्वी शेतकºयांच्या अंगणात बैलाचा गोठा असे. त्या गोठ्यात बैल दिसणे हे त्यांच्यासाठी भूषणावह होते. आता जनावरांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बैलाचे गोठे दिसेनासे झाले आहेत. पूर्वी जंगलात जनावरासाठी कुरण राखून ठेवायचे, आता कुरणही नष्ट होत आहेत. जनावरांपासून मिळणारे दूध, दही, लोणी, तूप शेतकºयांच्या घरीच बनविले जात होते. त्यावेळी ग्रामीण भागात दुधाची धवलक्रांती होती. लग्न कार्यप्रसंगी लागणारे दूध, दही गावातच मिळत होते. सोबत शेणखत तयार होते. शेतातील पिकाच्या उत्पादनात वाढ होत होती. त्यामुळे रासायनिक खताची गरज पडत नव्हती. प्रत्येक गावात दोन चार गुराखी जनावरांचे कळप जंगलात चारायला नेत होते. आता जंगले नष्ट होऊ लागल्याने जनावरांना चारा मिळणे कठीण झाले आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. चारा व पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी व शेतमजुरांनी गेल्या दहा वर्षात पाळीव जनावरे विकण्याचा सपाटा सुरू केला आहे. विक्रीस काढलेली जनावरे घेण्यास पुन्हा दुसरे शेतकरी उत्सुक नसतात. त्यामुळे आता दुधाळ जनावरे दसºयालाच विकावी लागतात.जंगल विरळसध्या सर्वत्र जंगले विरळ होत आहेत. अवैध वृक्षतोडीला उधाण आले आहे. परिणामी जंगले कमी होत आहे. त्यामुळे जनावरांना हिरवा चारा मिळणे कठीण झाले आहे. जंगलात चाराच उपलब्ध नसल्याने जनावरांना कुठे चारावे, असा प्रश्न पशु पालकांना पडला आहे. त्यातच काही जंगलावर अतिक्रमण झाले. अतिक्रमणधारक तेथे शेती करतात. अतिक्रमणधारक शेतकरी गावातील जनावरांना तेथे चरण्यासाठी येऊ देत नाहीत. त्यामुळे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर आहे.