शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुल कलाम उद्यानात पर्यटकांची विक्रमी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:25 IST

चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील असलेले अब्दुल कलाम उद्यान हे मागील दीड वर्षांपासून लोकांकरिता उघडण्यात आले.

आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील असलेले अब्दुल कलाम उद्यान हे मागील दीड वर्षांपासून लोकांकरिता उघडण्यात आले. अल्पवधीतच हे उद्यान नागरिकांच्या आकर्षणाचे स्थळ बनले आहे. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नागरिक या उद्यानाला भेट देत असून ही गर्दी दिवसागणिक विक्रमाकडे वाटचाल करीत आहेत.शनिवार, रविवार आणि सोमवार या नाताळच्या सुट्टीच्या तीन दिवसात तब्बल ११ हजार ४६८ पर्यटकांनी अशा या उद्यानाला भेट दिली आहे. हा या उद्यानात पर्यटकांच्या गर्दीचा विक्रमच ठरला आहे.राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून आणि कल्पनेने या उद्यानाच्या सौंदर्यीकरणाचे काम उत्तरोत्तर प्रगतिपथावर आहे. आकर्षक वृक्षवेली, जलसंचय तळे आणि या उद्यानाची विस्तीर्णता यामुळे या उद्यानात विद्यार्थ्यांच्या सहली आणल्या जात आहेत.चंद्रपूर जिल्ह्यासोबतच नजीकच्या आंध्रप्रदेश, गडचिरोली जिल्ह्याच्या भागातून येथे नागरिक येत आहेत. सद्या शाळांना नाताळाच्या सुट्ट्या असल्याने शाळांच्या सहली तसेच इतर अनेकजण या उद्यानाला भेट देवून आनंद घेत आहेत. त्यामुळे बल्लारपूर या मुख्य मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ राहत असते.याच मार्गावर बॉटनिकल गार्डन प्रस्तावित असून भविष्यात गार्डन मार्ग म्हणून बल्लारपूर रस्त्याला ओळखले जाणे, वावगे ठरणार नाही. अब्दुल आझाद कलाम गार्डनमध्ये प्रवेशासाठी शुल्क असून यातून अनेक कामांसाठी आर्थिक निधी उपलब्ध होत असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.