शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात विक्रमी ४३ लाख वृक्ष लागवड

By admin | Updated: July 8, 2017 00:37 IST

गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यपूर्ण परिश्रम करणाऱ्या वनविभाग व अन्य सर्व यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नाला यश आले असून...

उद्दिष्ट ओलांडले : नागरिकांसह सर्वच विभागांचा सहभागलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यपूर्ण परिश्रम करणाऱ्या वनविभाग व अन्य सर्व यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नाला यश आले असून जिल्ह्यात वनमहोत्सवाच्या समारोपाला चंद्रपूर जिल्ह्याने ४३ लाख वृक्ष लागवडीचा विक्रम केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक यंत्रणेने यावर्षी विक्रम केलेला आहे. वनविभाग, सामाजिक वनिकरण, वनविकास महामंडळ, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विविध उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था, खाजगी व्यक्ती यांच्याकडून २९ लाख १७ हजार ८८३ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित झाले होते. मात्र या शासकीय आकडयाला पार करत संपूर्ण जिल्ह्याने ४३ लाख २२ हजार ३२६ वृक्षांची लागवड केली आहे. तब्बल १४ लाख चार हजार ४४३ वृक्षांची अतिरिक्त लागवड केली आहे. वनविभागाकरिता १२ लाख ७६ हजार उद्दिष्ट होते. वनविभागाने १७ लाख ३७ हजार वृक्ष लागवड केली आहे. वनविकास महामंडळला आठ लाख ८१ हजार ८८३ उद्दिष्ट होते. त्यांनी १४ लाख ८५ हजार २०४ रोपांची लागवड करुन सहा लाख अतिरिक्त वृक्ष लागवड केली आहे. यासाठी महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. जिल्हा परिषदेने यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात ५० गावांमध्ये वृक्षदिंडी काढून वातावरण निर्मिती केली होती. जिल्हा परिषदेने स्वत:च तीन लाख ८० हजारांचे उद्दिष्ट घेतले होते. त्यांनी चार लाख ९२ हजार ५१० वृक्ष लागवड करुन विक्रम केला आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे व त्यांच्या चमूने यासाठी प्रयत्न केले असून सर्व ग्रामपंचायतीच्या उत्साहातील सहभागाबद्दल आभार मानले आहे. शिक्षण विभागानेही आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत १२ हजार ५०० चे उद्दिष्ट असताना ४४ हजार ४०० वृक्ष लागवड केली आहे. महावितरण व विद्युत विभागाच्या सर्व कंपन्यांनी मिळून यावेळी सात हजार ८०६ रोपे लावली आहे. महानगरपालिकेनेदेखील १५ हजारांच्या शासकीय उद्दिष्टाला ३० हजारापर्यंत वाढवून घेतले होते. या पलिकडे जात त्यांनी सात दिवसात ३३ हजार ८१८ झाडे लावण्याची किमया केली आहे. महापौर अंजली घोटेकर व मनपा आयुक्त संजय काकडे यांनी यासाठी पुढाकार घेतला होतो. विशेष म्हणजे, ही आकडेवारी आॅनलाईन नोंदणी झालेली आहे. याशिवाय जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु केलेल्या वृक्ष लागवडीच्या मिशनला सर्वस्तरातून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. आज शुक्रवारी शेवटच्या दिवशी पोलीस विभागाने कोठारी परिसरात मोठी वृक्षदिंडी काढली होती. यामध्ये सामान्य नागरिकांचा मोठया प्रमाणात सहभाग होता. जिल्हयाच्या विविध भागात ग्रामपंचायती, शाळा, शासकीय कार्यालयांमध्ये मोठया प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. जिल्हा उपनिंबधक कार्यालयाच्या वतीने बल्लारपूर पेपर मिलमध्ये कर्मचारी सहकारी संस्थेच्या सहकार्याने मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. या विभागाने आपले १३ हजारांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून शैक्षणिक संस्था, नगरविकास, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, उद्योग विभाग यांनी आपले उद्दिष्ट पार केले आहे.वनमंत्र्यांकडून गृहजिल्ह्याचे कौतुकपालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना यासाठी शाब्बासकी दिली असून गेल्या काही महिन्यांपासून व प्रत्यक्ष गेला आठवडाभर केलेल्या प्रचंड मेहनतीचे कौतुक केले आहे. गृह जिल्ह्यातून या मोहिमेला जे आत्मबळ मिळाले त्याला मी विसरु शकत नाही. प्रत्येक मिशनमध्ये चंद्रपूर जिल्ह्याने कायम पाठबळ दिले असून यावेळी २९ लाखांच्या उद्दिष्टाला ४३ लाखांचे भरीव योगदान कायम स्मरणात राहील, असे स्पष्ट केले आहे.