संताजी जगनाडे महाराज यांना मानणारा पोंभुर्णा तालुक्यात मोठा वर्ग आहे. संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्या ग्रंथाचे वाचन केले. त्यांनी ते लिहून काढले. त्यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार केला. त्यांच्या गाथा आजच्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या ठरत आहेत. त्यांचा विचारांचा सन्मान व्हावा, यासाठी या प्रवेशद्वाराला संताजी जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी नंदकिशोर बुरांडे, राकेश नैताम, अमोल देवताडे, ऋषी गव्हारे, महादेव सोमनकर, बाबूराव सातपुते, दिनेश बुरांडे, अमोल देवताडे, अरुण नैताम, देवराव दुधबडे, शंकर धोडरे, रामदास गव्हारे, सदा देवताडे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पोंभुर्णा येथील स्वागतद्वाराला संताजी जगनाडे यांचे नाव द्यावे - मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:36 IST