शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
3
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
4
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
5
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
6
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
7
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
8
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
9
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
10
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
11
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
12
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
13
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
14
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

रमजान ईदला वृक्षारोपणाची झालर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 01:40 IST

मुस्लीम बांधवाचा रमजान ईद पवित्र सण. या सणाला आगळेवेगळे महत्त्व समाज बांधवात आहे.

विसापुरातील मुस्लीम बांधवाचा उपक्रम : कब्रस्तान परिसरात वृक्ष लागवड लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : मुस्लीम बांधवाचा रमजान ईद पवित्र सण. या सणाला आगळेवेगळे महत्त्व समाज बांधवात आहे. याला जोड देण्यासाठी व सामाजिक कार्याला चालना देण्यासाठी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील मुस्लीम बांधवांनी कब्रस्तान परिसरात खुल्या जागेवर शेकडोवर वृक्षाची लागवड केली. सामाजिक बांधिलकीतून रमजान ईद सणाचे औचित्य वृक्षारोपणाची हिरवी झालर पसरविल्यामुळे या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्याचे योजिले आहे. यासाठी धरतीमाता हिरवीगार करण्याचा संकल्प केला आहे. वाढते प्रदूषण व पर्यावरणाचा ढासळलेला समतोल कायम ठेवण्यासाठी शासनस्तरावर आटोकाट प्रयत्न चालविला आहे. यासाठी लोकसहभागी महत्त्वाचा घटक आहे. या उपक्रमात आपलाही हातभार लागावा, म्हणून विसापूर येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईदचे औचित्य साधून कब्रस्तान परिसरात वृक्ष लागवड करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे. धर्माधर्मात वृक्षाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येकाने पर्यावरणाच्या रक्षणार्थ स्वत:ला झोकून दिले पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी प्रयत्नशील राहिला पाहिजे. समाजाप्रती आपण काय करतो, आपली भावना काय, हा संदेश देण्यासाठी व वृक्ष लागवड करून त्याची जोपासना करण्यासाठी विसापूर येथील नुरानी कब्रस्तान कमिटीचे अध्यक्ष हाजी पारीद शेख यांच्या मार्गदर्शनात कब्रस्तान परिसरात शेकडोवर वृक्षाची लागवड करण्यात आली. यासाठी बल्लारपूरचे तहसीलदार विकास अहीर, बल्लारपूर वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप वडेट्टीवार, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, वनरक्षक धामनगे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. बदलत्या तापमानाला सामोरे जाताना वृक्ष लागवड करून त्याचे जतन करणे महत्त्वाचे आहे. याचाच भाग म्हणून राज्यात १ ते ७ जुलैदरम्यान वन महोत्सवांतर्गत चार कोटी वृक्ष लगवडीचा कार्यक्रम शासनस्तरावरुन जाहीर केला आहे. या उपक्रमातून त्या योजनेला हातभार लागला आहे.