शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रामाळा तलाव लिकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

चंद्रपूर शहरात यापूर्वी अनेक तलाव होते. मात्र काळाच्या ओघात शहरातील घुटकाळा, तुकूम तलाव, कोनेरी यासारखे तलावात नष्ट झाले. आता केवळ रामाळा तलावच पाणीसाठा बाळगून आहे. विशेष म्हणजे, हा तलाव शहरात असल्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी उन्हाळ्यात झपाट्याने खालावत नाही.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन झोपेत । महिनाभरात ओसरले तीन ते साडेतीन फूट पाणी

राजेश भोजेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला व शहरातील पाण्याची पातळी वाढती ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला रामाळा तलाव मागील एक ते दीड महिन्यांपासून लिकेज आहे. तलावातील पाणी बाहेर काढण्यासाठी असलेली गोंडराजाकालीन मोरीतून पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे मागील एक महिन्यात तलावातील पाण्याची पातळी तीन ते साडेतीन फुटांनी कमी झाली आहे. याकडे मत्स व्यावसायिकांंनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे तलावातील पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.चंद्रपूर शहरात यापूर्वी अनेक तलाव होते. मात्र काळाच्या ओघात शहरातील घुटकाळा, तुकूम तलाव, कोनेरी यासारखे तलावात नष्ट झाले. आता केवळ रामाळा तलावच पाणीसाठा बाळगून आहे. विशेष म्हणजे, हा तलाव शहरात असल्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी उन्हाळ्यात झपाट्याने खालावत नाही. या तलावातील पाणी सोडण्यासाठी गोंड राजाच्या काळातच एक मोरी बांधण्यात आली होती. ती आजही कायम आहे. मात्र मागील एक ते दीड महिन्यांपासून सरदार पटेल महाविद्यालयाच्या दिशेला असलेली ही मोरी लिकेज झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे तलावातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. मागील काही दिवसात तलावाची पातळी तीन ते साडेतीन फूट कमी झाल्याची माहिती आहे.परिसरातील पाणी पातळी खालावणाररामाळा तलावातील पाण्यामुळे त्या परिसरातील पाण्याची पातळी वाढती राहते. मात्र तलावातील पाणी आता झपाट्याने कमी होत आहे. लवकरच मृतसाठ्यापर्यंत पातळी येईल. यामुळे परिसरातील पाण्याची पातळीही खालावून नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल.तलावातील पाणी दूषितरामाळा तलावातील पाणी अत्यंत दूषित आहे. मच्छी नाल्यातील पाणीही यात तलावात येऊन मिसळते. त्यामुळे या तलाव पाणी काढून स्वच्छ करण्याची मागणी इको-प्रोचे बंडू धोतरे व पर्यावरणप्रेमींनी मागील वर्षी केली होती. मात्र सदर दूषित पाणी पुढे वर्धा नदीत जाईल आणि नदीदेखील दूषित होईल म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही मागणी फेटाळली होती.तलाव लिकेज असल्याबाबत आपल्याला कळले आहे. मात्र तलावातील पाणी दूषित असल्यामुळे विसर्ग होऊ दिला जात आहे. पावसाळ्यात तलावात शुध्द पाणी राहील.- डॉ. कुणाल खेमणार,जिल्हाधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :Waterपाणी