शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

रामाळा सौंदर्यहीन, आझाद झुडपांचा ‘गुलाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:39 IST

चंद्रपुरातील सर्वात मोठ्या रामाळा गार्डनकडे स्थानिक प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे या गार्डनने आपले सौंदर्यच घालवले आहे. एकेकाळी या गार्डनमध्ये शहरातील मंडळी सहकुटुंब जाऊन निवांतपणे आपला वेळ घालवत होती.

ठळक मुद्देखुर्च्या तुटलेल्या, फरशा निघालेल्या, झुडपे वाढली, प्रवेशद्वाराचा मार्ग खडतर

राजेश भोजेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरातील सर्वात मोठ्या रामाळा गार्डनकडे स्थानिक प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे या गार्डनने आपले सौंदर्यच घालवले आहे. एकेकाळी या गार्डनमध्ये शहरातील मंडळी सहकुटुंब जाऊन निवांतपणे आपला वेळ घालवत होती. आता या गार्डनमध्ये पाय ठेवण्याचीही इच्छा होत नाही, इतकी दैना या गार्डनची झालेली आहे. आझाद बगिच्यातील काही साहित्य टिकून असले तरी या बगिच्याकडेही दुर्लक्ष झाल्यामुळे अनावश्यक झाडांनी बागेलाच गिळंकृत केले आहे.चंद्रपूर शहराच्या मध्यभागी गोंड राजाच्या काळातील तलाव आहे. त्याला रामाळा तलाव असे संबोधले जातात. या तलावामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या तलावातील जलसाठ्यामुळे परिसरात भुजलसाठा टिकून राहतो. या तलावाच्या बळावर अनेकांच्या घरी असलेल्या हातपंपांना वर्षभर पाणी येते. या तलावाच्या सौंदर्यात भर पडावी. तसेच शहरातील नागरिकांना अपुºया पडत असलेल्या आझाद बगिच्याव्यतिरित विरंगुळा म्हणून एक चांगला बगिचा मिळावा या हेतूने कासवाच्या आकाराच्या बगिच्याची निर्मिती या रामाळा तलावात करण्यात आली. हे गार्डन जनतेसाठी खुले झाल्यानंतर या ठिकाणी लहानमुलांना घेऊन चंद्रपूरकर मोठ्या संख्येने येथे आपला वेळ घालवत होते. सुटीच्या दिवशी तर येथे जत्रेचे स्वरुप यायचे. ‘नव्याचे नऊदिवस’ या प्रमाणे या गार्डनची अवस्था झालेली आहे. या गार्डनच्या देखभालीकडे प्रशासनाने कानाडोळा केल्यामुळे हे गार्डन आता सौंदर्य घालवून बसले आहे. गार्डनमध्ये असलेले मुलांच्या खेळण्याचे साहित्य मोडक्या अवस्थेत दिसत आहे. बसण्याच्या खुर्च्याही तुटलेल्या आहेत. झुडपे वाढलेली आहे. कारंजासाठी केलेल्या तलावातील पाण्याला दुर्गंधी सुटलेली आहे. अंतर्गत रस्त्यांवरील फरशा उखडलेल्या आहेत. प्रवेशद्वारापासून जाणारा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. इतकेच नव्हे, तर रामाळा तलावातील पाण्याचीही दुर्गंधी चंद्रपूरकरांना येथे येताना त्रासदायक ठरत आहे.सुरक्षेची ऐशीतैसीरामाळा गार्डनमध्ये दिवसभर अनेक मुले-मुली येतात. या मुला-मुलींवर टपोरींची तिरकस नजर असते. मात्र सुरक्षेची कसलीही हमी येथे मिळत नाही. या परिसरात स्टंटबाजीही बघायला मिळते. त्यावर कुणाचेही नियंत्रण राहात नाही. नुकतेचे दोन युवकांना अशाच स्टंटबाजीला बळी पडावे लागले.आंबटशौकिनांसाठी सुरक्षित ठिकाणआता हे गार्डन केवळ आंबटशौकिन प्रेमीयुगलांसाठी सुरक्षेचे ठिकाण बनले आहे. सकाळपासून दिवसभर येथे मजनुंचा वावर असतो. तेथे तयार झालेल्या झुडपांमध्ये चुकीने पाय पडला, तर कुणाच्याही अंगावर पडू शकतो. या व्यतिरिक्त या गार्डनमध्ये कुणीही दिसत नाही. अशी बिकट अवस्था या गार्डनची झालेली आहेत.आझाद गार्डनची मिनी ट्रेन बंदचआझाद बागेत लहानमुलांना खेळण्यासाठी अनेक साहित्य होते. बागेत लहानमुलांसाठी मिनी ट्रेनसुद्धा धावत होती. हे सगळे विरंगुळ्याचे साहित्य आझाद बगिच्यासह रामाळा गार्डनमध्ये नावालाच उरले आहे. स्थानिक प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे आता केवळ सकाळी फिरण्यासाठी तेवढा आझाद बगिच्याचा वापर उरला आहे.