शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

राखी कंचर्लावार चंद्रपूरच्या नव्या महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 13:35 IST

भाजपच्या राखी कंचर्लावार चंद्रपूरच्या नव्या महापौर निवडून आल्या तर राहुल पावडे यांची उपमहापौरपदी निवड झाली.

ठळक मुद्देराहुल पावडे उपमहापौर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. काँग्रेसनेही रणशिंग फुंकल्याने या निवडणुकीची चुरस मागील काही दिवसांपासून वाढली होती. मात्र भाजप सदस्य अखेरपर्यंत एकत्र राहिल्याने भाजपच्या राखी कंचर्लावार यांचा दणदणीत विजय झाला. राखी कंचर्लावार यांना ४२ मते तर काँग्रेसच्या कल्पना लहामगे यांना २२ मते पडली.  दोन नगरसेवक गैरहजर राहिले. तर काँग्रेसच्या सुनिता लोढिया यांनी आपले नामांकन परत घेतले.यासोबत उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल पावडे आणि काँग्रेसचे अशोक नागापुरे रिंगणात होते. यात भाजपचे राहुल पावडे यांचा २० मतांनी विजय झाला. त्यांना ४२ मते पडली तर काँग्रेसचे नागापुरे यांनाही २२ मतांवर समाधान मानावे लागले. उर्वरित बसपा आघाडीचे अनिल रामटेके, शहर विकास आघाडीचे दीपक जयस्वाल, काँग्रेसचे प्रशांत दानव आणि मनसेचे सचिन भोयर यांनी आपले नामांकन शुक्रवारी निवडणुकीपूर्वी परत घेतले.चंद्रपूर महानगरपालिकेचे महापौर पद यावेळी महिलेसाठी (खुला प्रवर्ग) राखीव होते. महापौर पदाच्या खूर्चीवर विराजमान होण्यासाठी इच्छुक नगरसेविकांनी आपली धडपड वाढविली होती.  ६६ सदस्यांच्या चंद्रपूर महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत म्हणजे ३७ नगरसेवक आहेत. त्यापाठोपाठ कॉंग्रेसकडे १३, बसपा - ६, राष्टÑवादी -२, शिवसेना - २,  मनसे - २, तर चार नगरसेवक अपक्ष आहेत. विद्यमान महापौर अंजली घोटेकर यांचा कार्यकाळ ३० आॅक्टोबरला संपला. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली होती. चंद्रपूर महापालिका २०१२ ला अस्तित्वात आल्यापासून तीन महापौर बसले. हे तीनही महापौर महिलाच होत्या आणि आता चवथ्यांदाही महिलाच महापौर राहणार हे निश्चित होते. मागील काही दिवसांपासून मनपा वर्तुळातील राजकीय हालचालींना वेग आला होता.दरम्यान, महापौर पदासाठी भाजपकडून राखी कंचर्लावार तर काँग्रेसकडून सुनिता लोढिया व कल्पना लहामगे यांनी नामांकन दाखल केले होते. उपमहापौर पदासाठी एकूण सहा जणांनी नामांकन दाखल केले. यात भाजपकडून विद्यमान स्थायी समिती सभापती राहुल पावडे, शहर विकास आघाडीकडून दीपक जयस्वाल, बसपा आघाडीकडून अनिल रामटेके, काँग्रेसकडून अशोक नागापुरे, प्रशांत दानव व मनसेकडून सचिन भोयर यांनी आपले नामांकन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहे.चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. ३७ नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे महापौर पदावर भाजपचाच महापौर बसेल, असे जवळजवळ निश्चित होते. तरीही काँग्रेसने आपले उमेदवार महापौर पदासाठी उभे केले. फोडाफोडीचे राजकारण त्यांच्याकडून खेळले जाण्याची शक्यता होती. ऐनवेळी फुटाफुटीचे राजकारण होऊ नये, म्हणून भाजपाने आपल्या सर्व नगरसेवकांना पेंच येथे सहलीला पाठविले. रविवारी दुपारीच सर्व ३७ नगरसेवक पेंचसाठी रवाना झाले. हे नगरसेवक २१ नोव्हेंबरलाच परत आले.  जादुई आकडा जुळविण्यासाठी काँग्रेसनेही प्रयत्न केला. मात्र भाजपचा कोणताही नगरसेवक पक्ष आदेशाबाहेर गेला नाही.

टॅग्स :Mayorमहापौर