शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 05:00 IST

असेच वातावरण राहिले तर, धान कापणी लांबत राहणार असून लोंबातील धान झडून उत्पादनावर परिणाम होणार आहे. मागील आठवड्यापासून तालुक्यात शेतकऱ्यांनी धान कापणीस सुरूवात केली आहे. मात्र गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने काही शेतकऱ्यांनी कापणी थांबवली. त्यातच शनिवारी व रविवारी  काही काही ठिकाणी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड :  जिल्ह्यात पावसामुळे  शेतकऱ्यांचे  मोठे नुकसान झाले आहे. धान, सोयाबीन, कापूस उत्पादनकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. नागभीड तालुक्यात धान मोठ्या प्रमाणावर कापणीस आला आहे. अशातच ढगाळ वातावरण शनिवारी व रविवारी काही प्रमाणात  झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. असेच वातावरण राहिले तर, धान कापणी लांबत राहणार असून लोंबातील धान झडून उत्पादनावर परिणाम होणार आहे.मागील आठवड्यापासून तालुक्यात शेतकऱ्यांनी धान कापणीस सुरूवात केली आहे. मात्र गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने काही शेतकऱ्यांनी कापणी थांबवली. त्यातच शनिवारी व रविवारी  काही काही ठिकाणी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धान कापणी लांबणार आहे. धान कापणी अशीच लांबत राहिली तर, उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कापणीस आलेले धानाचे लोंब पूर्णतः पक्व झालेले आहेत. हलक्या हवेने आणि काही ठिकाणी पडत असलेल्या पावसाने लोंबातील धान झडून त्याच्या उत्पन्नावर परिणामाची शक्यता आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी ठोकळ धानाची लागवड केली. मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या धानाला मोठा फटका बसणार आहे.

वाघाचा शेतात दबा, शेतकरी भयभीत नागभीड जवळच्या शेतशिवारात एक वाघ पिल्लांसह दबा धरून आहे. परिणामी शेतकरी चांगलेच भयभीत झाले असून शेतीची कामे कशी करावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. नागभीड लगतच सुलेझरी आणि खैरीचक पारखीचा शेतशिवार आहे. या शेतशिवारात धानाची लागवड करण्यात आली असून सध्या  धान कापणीला आहे. याशिवाय समाधानकारक पाऊस पडल्याने काही शेतकरी लाखोळीची टाकणीही करीत आहेत. हा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांचे शेतावर नियमित जाणे येणे असते. असेच नियमित जाणे येणे असणाऱ्या काही शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतावर जाणेच बंद केले आहे. आता धान कापणीला येत असल्याने धानाची कापणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती