शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

पावसाने मिळाला बळीराजाला दिलासा

By admin | Updated: July 24, 2015 01:02 IST

गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

धानाच्या रोवणीला वेग : शेतपिकांना आला बहरचंद्रपूर/मूल/ब्रह्मपुरी : गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. ब्रह्मपुरी, मुल तालुक्यात रोवणीच्या कामांना वेग आला असून इतरही ठिकाणी पावसाने पिकांना बहर आली आहे. गेल्या २४ तासात ९८७.४ मिमी पावसाची नोंद झाली. मूल तालुक्यात तब्बल १९ दिवसानंतर पाऊस झाला. गेल्या चोविस तासात ९६.६ मिमी पावसाची नोंद तालुक्यात झाली. त्यामुळे चिंतातूर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. शेतातील पेरलेले धानाचे पऱ्हे करपायला लागल्याने शेतकरी पुरता खचला होता. दुबार पेरणी करावी लागणार काय, या चिंतेत असताना वरुण राजाचे आगमन झाल्याने बळीराजा काही प्रमाणात सुखावण्याचे चित्र दिसत आहे.तालुक्यात २४०० हेक्टर क्षेत्र पिकाखाली असून २०१३.५९ हेक्टर आर क्षेत्रात धानाची लागवड लावण्यात आली आहे. तर ३४१ हेक्टर आर क्षेत्रात आवत्या, सोयाबीन १११२ हेक्टर, कापूस ७५ हेक्टर तर तूर ४३८ हेक्टर आर मध्ये लावण्यात आले आहे. धानाची पेरणी केल्यानंतर तब्बल १९ दिवस पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होती. तर ब्रह्मपुरी तालुक्यात बुधवारी २८.८ मिमी पावसाची नोंद झाली. धान या पावसाने रोवणी कामाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील खरीप पिकांचे क्षेत्र २९ हजार ४६० हेक्टर असून जवळपास १५ हजार हेक्टर जमिनीवरील रोवण्या पावसाने खोळंबल्या होत्या. धानपिकांचे पऱ्हे कोमजलेल्या अवस्थेत होते. परंतु बुधवारी २८.८ मिमी पाऊस झाल्याने रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गावखेड्यात रोवणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता असताना ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या वेगही वाढल्याने शेतकऱ्यांसमोर पहिले रोवणी पूर्ण करण्याचा कल असल्याचे दिसून येत आहे. पावसाने मारलेली दडी सर्वच स्तरातील लोकांना चिंतेचा विषय असताना कालच्या पावसाने थोडी मुक्तता मिळवून दिली आहे.मात्र पावसाची उघडझाप सुरू असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतरही अनेकांच्या घरातील कुलर अद्याप सुरू आहेत. (प्रतिनिधी)वीज पडल्याने लाखोंचे नुकसानमारोडा : मूल तालुक्यात बुधवारी मुसळधार व विजांच्या कडकडाटसह पाऊस झाला. कमलाकर गडपल्लीवार यांच्या घरावर मध्यरात्री वीज कोसळल्याने त्यांचे व शेजाऱ्यांच्या घरातील विजेवर चालणारी उपकरणे निकामी झालीत. टीव्ही संच, फ्रिज, मीटर व विद्युत बोर्डचे नुकसान झाले. शेजारी राहणाऱ्या लक्ष्मी तुम्मे, सतीश खोबरे, दिलीप नेरलवार, वासुदेव शंखदरवार यांचे टी.व्ही. संच निकामी झाले. या नैसर्गिक आपत्तीत जीवहानी टळली असली तरी लाखोंचे नुकसान झाले आहे.