शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

रेन वॉटर हॉर्वेस्टिंग काळाची गरज

By admin | Updated: July 6, 2015 00:47 IST

देशातील विविध भागामध्ये पाण्याची समस्या नेहमी जाणवते.

रमाकांत लोधे यांनी केला घरीच प्रयोग : इतरांनीही घ्यावा आदर्शनवरगाव : देशातील विविध भागामध्ये पाण्याची समस्या नेहमी जाणवते. आपल्याकडे विशेषत: पावसाळ्यातच पाणी येते आणि वाहून जाते. त्यासाठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ असा नारा शासनाला द्यावा लावला. यासाठी रेन वॉटर हॉर्वेस्टिंग (पावसाच्या पाण्याचे संधारण) ही काळाची गरज आहे.आज सर्वत्र गावात आणि शेतात बोअरवेल खोदल्या जात असून त्याद्वारे जमिनीतील पाणी ओढण्याचे काम सुरू आहे. मात्र जमिनीमध्ये पाणी मुरविण्याचे कामही आवश्यक आहे. याची जाणीव झाल्याने सिंदेवाही पंचायत समितीचे उपसभापती रमाकांत लोधे यांनी रत्नापूर येथे आपल्या निवासस्थानी चार-पाच हजार रुपये खर्च करून रेन वॉटर हॉर्वेस्टिंग (पावसाच्या पाण्याचे संधारण) चा प्रयोग सुरू केला. त्यांच्या घराच्या ३५०० ते ४००० हजार स्क्वे.फुट स्लॅबवरील पावसाचे पाणी विहिरीत टाकण्याचा अभिनव व यशस्वी प्रयोग केला आहे. पावसाचे पाणी विहिरीत टाकण्यासाठी स्लॅबला पीव्हीसी पाईप ७५ एम.एम., ४ केजी त्यांनी एकत्र जोेडले व ते आवारातील विहिरीपर्यंत आणले. त्यामुळे स्लॅबवर पडलेले पावसाचे पाणी इतरत्र न जाता विहिरीमध्ये पाईपद्वारे येते व विहिरीतच मुरते.उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची टंचाई भासते. भुजल पातळी खाली जाते. विहिरीत पाणी राहत नाही.ग्रामीण भागामध्ये नळयोजना असली तरी तीन-चार दिवसानंतर नळाला पाणी येते. नदीलाच पाणी नाही तर नळाला कुठून येणार, अशी ओरड सुरू होते. उन्हाळ्यामध्ये एका व्यक्तीला साधारणत: ४० लिटर पाणी लागते, असे शासनाच्या पाणी पुरवठा विभागाचे म्हणणे आहे. समजा ६०० चौरस फुट छपराचे पाणी विहिरीत टाकले किंवा जमिनीत मुरवले तर एका वर्षाला अंदाजे पर्जन्यमानानुसार ६० हजार लिटर पाणी जमिनीत मुरते. हे ६० हजार लिटर पाणी वर्षभरात सरकारी आकड्यानुसार चार व्यक्तींच्या उपयोगात येते. प्रत्येक व्यक्तीने जर आपल्या घराच्या छपरावरील पाणी विहिरीत मुरवले तर भविष्यात कधी पाणी टंचाई भासणार नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच राजस्थानमध्ये रेन वॉटर हॉर्वेस्टिंगची देशाला अत्यंत गरज असल्याचे मत प्रकट केले. त्याच धर्तीवर रमाकांत लोधे यांनी ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’ स्वत:च्या घरी करून राष्ट्रीय कार्याला हातभार लावला आहे. तसेच दुसऱ्या इमारतीवरील पाणीसुद्धा दुसऱ्या विहिरीत सोडण्याचा उपक्रमही केला असल्याने त्यांच्या या प्रयोगाचे अनेकांनी अनुकरण करावे. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईवर आपण मात करू शकतो. (वार्ताहर)