शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पाऊस बेपत्ता; दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे कडक तापलेली जमीन ओलीचिंब झाली. हा पाऊस दोन ते तीन दिवस सतत सुरू होता. पावसाने थोडी उसंत घेताच आनंदीत शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. अनेकांनी कापूस, सोयाबीन पेरणी तर धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. मात्र गेल्या आठ दिवसांपासून अचानक ...

ठळक मुद्देचिंता वाढली : शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे कडक तापलेली जमीन ओलीचिंब झाली. हा पाऊस दोन ते तीन दिवस सतत सुरू होता. पावसाने थोडी उसंत घेताच आनंदीत शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. अनेकांनी कापूस, सोयाबीन पेरणी तर धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. मात्र गेल्या आठ दिवसांपासून अचानक पाऊस बेपत्ता असल्याने पेरणी केलेले बियाणे अंकुरण्यापूर्वीच करपण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून पावसासाठी शेतकºयांच्या नजरा आता आकाशाकडे खिळल्या आहेत.जिल्ह्यात खरिप हंगामात कापूस, धान, सोयाबीन या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मृग नक्षत्राच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाने पेरणीची लगबग सुरू केली. जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस झाला. मात्र अचानक पाऊस गायब झाल्याने कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या पेरण्या वाया जातात की काय, अशी भिती आता निर्माण झाली आहे. हवामान खात्यानुसार जुनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून धडकणार होते. मात्र पावसाने दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावली. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली असून आता मात्र पाऊसच बेपत्ता झाल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.चिमूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकटचिमूर : तालुक्यात ७ जूनला झालेल्या पावसाने तालुक्यातील खडसंगी, आमडी, बोथली, रेगाबोडी, भिवंकुड आदी गावातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पिकाची लागवड केली. काही प्रमाणात कापूस व सोयाबीनची बियाणे उगवली. मात्र पावसाची दडी व कडक उन्ह तापत असल्याने उगवलेली रोपे करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक-दोन दिवसांत पाऊस न पडल्यास दुबार पेरणी करण्याची वेळ या शेतकऱ्यांवर येणार आहे.शेतकऱ्यांची निराशाचतोहोगाव : चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी यावर्षीही शेतकऱ्यांची निराशाच होणार असल्याचे संकेत पावसाच्या दडीवरून दिसून येत आहेत. पहिल्याच दमदार पावसाने अनेकांनी पेरणी केली. मात्र आता बियाणे करपून जाण्याची भिती आहे. गतवर्षी बोंडअळी व मावातुडतुडा रोगाने शेतकºयांना बेजार केले. यावर्षी पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांची दयनीय अवस्था होणार आहे.पेरणीचा खर्च वाया जाणारआयुधनिर्माणी : पहिल्याच पावसाने अनेक शेतकरी आनंदीत होत बियाण्यांची पेरणी केली. मात्र आता पावसाने दडी मारली असून दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे उसणवारीवर किंवा कर्ज काढून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा खर्च वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे.बल्लारपूर तालुक्यात ७० टक्के पेरणीबल्लारपूर : पावसाचा अंदाज न घेता पहिल्याच पावसाने आनंदित होवून बल्लारपूर तालुक्यातील जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. मात्र आठवडाभरापासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. २३ जूनपर्यंत पाऊस पडणार नसल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले असून अनेकांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.बियाणे करपण्याच्या मार्गावरघोसरी : मृग नक्षत्राच्या प्रारंभीच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने महागडी बियाण्यांची पेरणी केली. परंतु, पावसाच्या दडीने व तप्त उन्हामुळे बियाणे अंकुरण्याआधीच जमिनीतच करपण्याच्या मार्गावर आहेत. मृगाच्या प्रारंभीच पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही प्रमाणात तलाव, बोड्यांमध्ये पाणी साचले. मात्र आता पावसाने दगा दिला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बियाणे करपू नये यासाठी आईल इंजिनद्वारे पाणी देत आहेत.