शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने गिळंकृत केला पांदण रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST

विसापूर : येथील स्मशानभूमीजवळील रेल्वे पुलापासून जाणारा पांदण रस्‍ता रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्यावरची माती खोदून बंद ...

विसापूर : येथील स्मशानभूमीजवळील रेल्वे पुलापासून जाणारा पांदण रस्‍ता रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्यावरची माती खोदून बंद केला व मोठमोठे खड्डे खोदल्याल्यामुळे ते आता गिळंकृत केल्यासारखे वाटू लागले आहे.

पोल क्र.८८५/१सी पासून ट्रॅकच्या बाजूला भरण भरण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारे भरण रेल्वेने आखून दिलेल्या हद्दीत असलेल्या जागेतून घेतले आहे. असे तिथे काम करणाऱ्या सुपरवायझरचे म्हणणे आहे. तर शेतात अतिक्रमण करून शेतातील माती खोदत आहे, असा आरोप यामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यानी केला आहे. याबाबतची तक्रार, माहिती भूमी अभिलेख कार्यालय बल्लारपूर येथे त्यांच्यामार्फत देण्यात आली आहे.

शेतात जाण्यासाठी पूर्वीपासूनच पांदण रस्ता अस्तित्वात आहे. ब्रिटिशकाळातसुद्धा हा रस्ता पूर्वीच्या चांदा (चंद्रपूर)ला जाण्यासाठी विसापूरकर वापरत होते. आताही हा रस्ता शेतकरी शेतात व भिवकुंडला जाण्यासाठी वापरतात. रेल्वे विभागाने तो खोदून मार्ग पूर्णपणे बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे आता शेतात कसे जायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यापूर्वी चौथ्या रेल्वे लाईनच्या भूमी अधिग्रहणाच्या वेळी रेल्वेने संबंधित भूधारकांना नोटीस बजावून भूमी अभिलेख कार्यालयाच्या साहाय्याने भूमी अधिग्रहण केले होते. त्याप्रमाणेच हे कार्य करायला केले पाहिजे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.