शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे फाटक दुचाकी वाहनावर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:46 IST

मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गोंदिया-चंद्रपूर रेल्वे क्रासिंगवरचे फाटक अचानक दुचाकी वाहनावर कोसळले. सुदैवाने ‘ते’ प्रवासी थोडक्यात बचावले.

ठळक मुद्दे‘ते’ वाहनधारक थोडक्यात बचावले : ब्रह्मपुरी येथे उड्डाणपुलाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गोंदिया-चंद्रपूर रेल्वे क्रासिंगवरचे फाटक अचानक दुचाकी वाहनावर कोसळले. सुदैवाने ‘ते’ प्रवासी थोडक्यात बचावले. या घटनेत एका दुचाकी वाहनाच्या हेड लाईटच्या काचा फुटल्याने नुकसान झाले.गोंदिया-चंद्रपूर ५८८०२ या क्रमांकाची पॅसेंजर रेल्वेगाडी ब्रह्मपुरी रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर ब्रह्मपुरी-आरमोरी या राज्यमार्गावरील रेल्वे फाटक बंद करण्यात आले होते. रेल्वेगाडी चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाल्यानंतर रेल्वेफाटक उघडण्यात आले. परंतु रेल्वे फाटकचा एक गेट काही अंतरावर वर गेला असता अचानक तो वाकून लोंबकळू लागला. सुदैवाने यात तीन प्रवासी बचावले. पण रेल्वे फाटक वाकून एका प्रवाशाच्या दुचाकीच्या समोर पडल्याने दुचाकीचे हेडलाईट फुटले. वाकलेला फाटक थोडेसे मागे पडले असते तर कदाचित तो वाहनधारकाच्या डोक्यावर पडून गंभीर धोका निर्माण झाला असता, असे प्रत्यक्षदर्शी वाहनधारकांचे म्हणणे होते.फाटक नेमके कशामुळे वाकले असेल, याचे कारण जरी समजले नसले तरी कदाचित फाटक गंजल्याने वाकले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या फाटकाची देखभाल ज्या संबंधीत विभागाकडे आहे, त्यांच्या ही बाब लक्षात येणे आवश्यक असतानाही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. तर दुसरीकडे वाहनधारक पूर्ण फाटक उघडण्यापूर्वीच घाईने वाहने काढण्यास सुरूवात करतात. त्यामुळे अशा प्रसंगाना तोंड द्यावे लागत असते. त्यामुळे वाहनधारकांनी नियम, शिस्त पाळणे आवश्यक आहे. या फाटकाजवळ वाहनांच्या रांगा लागत असतात. आता या घटनेमुळे उड्डाण पुलाची मागणी जोर धरू लागली आहे.सकाळी फाटक वाकल्याची घटना घडताच आम्ही लगेच धाव घेतली. फाटक वाकल्याचे नेमके कारण माहिती नसून प्रवाश्यांनी शिस्त व नियमांचे उल्लंघन करु नये.- निर्मलकुमार, उपरेल्वे अधीक्षक, ब्रह्मपुरी.