शहरं
Join us  
Trending Stories
1
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामन, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
2
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
3
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
4
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
5
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
6
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
7
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
8
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
9
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
10
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
11
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
12
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
13
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
14
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
15
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
16
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
17
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
18
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
19
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
20
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न

आंदोलनाच्या इशाऱ्याने रेल्वे प्रशासनाने निर्णय बदलविला

By admin | Updated: November 6, 2014 22:52 IST

मध्ये रेल्वेच्या वरोरा विभागात नाईट पेट्रोलिंगसाठी पाठवित असलेल्या दोन गँगमन ऐवजी एक गँगमन पाठविण्यात येणार असल्याचे आदेश प्रशासनाने दिले. रात्री एकाच गस्तीत दोन गँगमन पाहिजे,

अधिकाऱ्यांची धावपळ : दोनऐवजी एकच गँगमनची ड्युटीवरोरा : मध्ये रेल्वेच्या वरोरा विभागात नाईट पेट्रोलिंगसाठी पाठवित असलेल्या दोन गँगमन ऐवजी एक गँगमन पाठविण्यात येणार असल्याचे आदेश प्रशासनाने दिले. रात्री एकाच गस्तीत दोन गँगमन पाहिजे, या मागणीकरिता नॅशनल रेल्वे मजदूर युनियन शाखा वरोराच्यावतीने रेल रोको आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनास दिला. संघटनेचे सदस्य संघटनेच्या कार्यालयात गोळा होवू लागले. त्यामुळे वातावरण तापत असताना रेल्वे प्रशासनाची झोप उडाली. तो आदेश अवघ्या काही तासात रद्द करुन रात्रपाळीत दोन गँगमन पाठविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यामुळे रेल रोको आंदोलन स्थगित झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.गँगमन रात्रपाळीत रात्री ११ ते सकाळी सात वाजेपर्यंत चार किलोमिटरपर्यंतच्या रेल्वे ट्रॅकची देखभाल करतात. रात्रीच्यावेळी ही देखभाल करीत असताना एकावर रानडुकराने हल्ला केला. एकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने तर एक गँगमन रेल्वे ट्रॅकमध्ये पाय अडकल्याने जखमी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशा घटना वारंवार घडत असल्याने रात्रपाळीत दोन गँगमनची ड्युटी लावण्यात येत असताना वरोरा येथील रेल्वे प्रशासनाने त्याची संख्या एकवर आणली असल्याची माहिती नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यासोबत ३१ रेल्वे कर्मचारी रेल्वे अधिकाऱ्यांच्या घरी खासगी कामावर ठेवल्याने रात्रपाळीत दोन गँगमन दिले जात नसल्याचा आरोप वरोरा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी करीत त्यांच्याकडून प्रत्येक महिन्याला रक्कमही घेतली जात असल्याची माहिती दिली. त्यामुळे रात्रपाळीत एकच गँगमन पाठविण्यात येत आहे. अशी माहिती युनियनच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी रात्रपाळीत दोन गँगमन देण्यात यावे, याकरिता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देत रेल्वे रोको करण्याचा इशाराही ४ नोव्हेंबर रोजी दिला. रात्री सात वाजता वरोरा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको करण्यासाठी युनियनच्या कार्यालयात सदस्य गोळा झाले. निर्णय मागे घेण्यात आला. परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे खासगी कामाकरिता असलेल्या ३१ कर्मचाऱ्यांना आपल्या पूर्ववत कामावर परत घेण्याकरिता १८ नोव्हेंबरपर्यंत नॅशनल रेल्वे मजदूर युनियच्या पदाधिकाऱ्यांनी वेळ दिला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये नॅशनल रेल्वे मजदूर युनियन शाखा वरोराचे अध्यक्ष विनोद लभाने, सचिव नितीन काकडे, कोषाध्यक्ष रामदास वांढरे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)