मीठ टंचाईच्या अफवेमुळे दुकानात रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:00 AM2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:01:06+5:30

सावली, सिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये काही लोकांकडून अफवा पसरवण्यात आली. परंतु, जिल्ह्यामध्ये मुबलक स्वरूपात मिठाचा साठा उपलब्ध आहे. मिठाचा तुटवडा असल्याबाबत कोणी अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मीठ खरेदीसाठी रांगा लावू नयेत किंवा जास्तीचे पैसे देऊन मीठ खरेदी करू नये.

Queues in the shop due to rumors of salt shortage | मीठ टंचाईच्या अफवेमुळे दुकानात रांगा

मीठ टंचाईच्या अफवेमुळे दुकानात रांगा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : जिल्ह्यात मिठाचा तुटवडा नाही

चंद्रपूर : लॉकडाऊन काळात मिठाचा तुटवडा असल्याचे सांगून जिल्ह्यात अफवा पसरविली जात आहे. याचे परिणाम दिसून येत असून मीठ खरेदीसाठी नागरिकांनी किराणा दुकानात एकच गर्दी केल्याचे गुरुवारी दिसून आले. सावली, सिंदेवाही, नागभीड, चिमूर, कोरपना आदी ग्रामीण भागात ही अफवा पसरल्याचे दिसून आले. दरम्यान, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या मिठाचा तुटवडा नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे. मोठया प्रमाणात मिठ साठा उपलब्ध असून यापुढे अफवा पसरणाऱ्याविरुध्द कारवाई केली जाईल, असेही खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.
सावली, सिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये काही लोकांकडून अफवा पसरवण्यात आली. परंतु, जिल्ह्यामध्ये मुबलक स्वरूपात मिठाचा साठा उपलब्ध आहे. मिठाचा तुटवडा असल्याबाबत कोणी अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मीठ खरेदीसाठी रांगा लावू नयेत किंवा जास्तीचे पैसे देऊन मीठ खरेदी करू नये. अफवांवर विश्वास ठेवून लोकांनी मीठ जास्तीचे खरेदी केल्यास जिल्हयात मीठ संपण्याच्या अडचणीस सामोरे जावे लागेल. मात्र जिल्ह्यात मीठाचा मुबलक साठा असून अकारण मीठ खरेदी करून साठा करू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. दुकानदारांनीही याबाबत आवश्यक काळजी घेऊन ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेऊन मीठ विक्री करू नये. तसेच याबाबत येणाºया ग्राहकांनाही खरी माहिती द्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.

Web Title: Queues in the shop due to rumors of salt shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.