शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बँकेअभावी ग्रामीणचे व्यवहार खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:27 IST

राजुरा तालुक्यातील देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. आर्थिक व्यवहार सुरळीत असताना २००८-०९ मध्ये अचानक स्थानिक शाखा बंद करण्यात आली.

ठळक मुद्देयोजनांचे अनुदान घेताना अडचणी : देवाडा परिसरातील २५ गावांची आर्थिक कोंडी

शंकर मडावी ।आॅनलाईन लोकमतदेवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. आर्थिक व्यवहार सुरळीत असताना २००८-०९ मध्ये अचानक स्थानिक शाखा बंद करण्यात आली. परिणामी, २५ गावांतील नागरिकांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. व्यवहार करण्यासाठी नागरिकांना २५ ते ३० किमी अंतरावरील राजुरा शहरात जावे लागत आहे.देवाडा गावाची लोकसंख्या चार हजारांपेक्षा अधिक असून परिसरातील अनेक गावांचा संपर्क येतो. कोष्टाळा, लक्कडकोट, आनंदगुडा, खिर्डी, पारधीगुडा, सिद्धेश्वर, सोंडो, सोनुर्ली, भेंडाळा, बेरडी, देवापूर, काकळघाट, मोर्लीगुडा, येरगव्हाण, कावळगोंदी, भेंडची, सोनापूर, गेरेगुडा आदी गावांतील नागरिक देवाडा येथील बाजारपेठावरच अवंलबून आहेत. रविवारी येथे मोठा बाजार भरतो. अनेक वर्षांपासून हा बाजार सुरू आहे. परंतु राष्टÑीयीकृत बँक नसल्यामुळे प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी राजुरा येथे जाण्याशिवाय अन्य पर्याय नाही. महिला बचतगटांना दरमहा रक्कम उचल करणे आणि भरण्यासाठी बँकेत जावे लागते. शेतकऱ्यांना कर्ज फेडणे, नवीन कर्ज घेणे, बँकेत खाते उघडणे, निराधार, श्रावणबाळ योजना, दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना बँकेतून दरमहा रक्कम घेण्याकरिता राजुरा येथे दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भूर्दंड बसतो. शासनाच्या धोरणांमुळे बरीच कामे आॅनलाईन आता झालीत. जनधन योजना, अटल पेंशन योजना, शौचालय बांधकामाचे अनुदान, आदी सर्वच योजनांसाठी बँक खाते अनिवार्य केले. पण, देवाडा येथे बँकच नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोजगाराची कामे सोडून शेकडो शेतकरी राजुऱ्यात येत आहेत. देवाडा परिसरात आर्थिक उलाढाल मोठी आहे. बँकेअभावी शासकीय योजनांचाही लाभ घेता येत नाही.कर्मचारी, दुकानदार हैराणकर्मचारी देवाडा परिसरात २५ पेक्षा अधिक गावे येतात. ग्रामपंचायत कार्यालय, आश्रम शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक उपकेंद्र, पशु चिकित्सा केंद्र, महाविद्यालय, कृषी विभाग, शासकीय रोपवाटीका, वन विभाग शासकीय आयटीआय आणि गावांतील दुकानदारांना बँकेअभावी आर्थिक व्यवहार करता येत नाही. शासनाच्या विविध विभागाचे कर्मचारीदेखील हैराण झाले आहेत.शासकीय योजनांमध्ये अडचणीकेंद्र व राज्य शासनाकडून विकासाच्या विविध योजना राबविले जात आहेत. या योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागत आहे. बँकच नसल्याने खाते कुठे सुरू करावे, त्यासाठी मागदर्शन कोण करणार, आदी प्रश्न निर्माण झाले. आर्थिक व्यवहार सुरळीत असताना अचानक विदर्भ कोकण बँकेची शाखा बंद करून अडचणी वाढविण्यात आल्या .