३० लाख ४४ हजार २२६ क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 05:00 AM2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:01:07+5:30

खरिपामध्ये धान उत्पादकांना गोसीखुर्दवरून आणखी पाणी मिळावे, गोसीखुर्दच्या पाण्याच्या वितरणातून चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाधिक भागामध्ये सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने जिल्ह्यात सुरु व्हावा, यासाठी त्यांनी नुकतीच नागपूर येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी वर्धा नदीच्या काठावर विस्तीर्ण प्रदेशात कापूस उत्पादकांची मोठ्या प्रमाणात संख्या असून या उत्पादकांनादेखील सिंचनाचा कसा फायदा होईल, यासंदर्भात लवकरच आढावा घेतला असल्याचे सांगितले.

Purchase of 30 lakh 44 thousand 226 quintals of cotton | ३० लाख ४४ हजार २२६ क्विंटल कापूस खरेदी

३० लाख ४४ हजार २२६ क्विंटल कापूस खरेदी

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांची माहिती, कापूस उत्पादकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये धान (भात) पिकाबरोबरच कापूस पीकदेखील घेण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यातून एक लाख ६३ हजार ६१६ शेतकऱ्यांकडून ३० लाख ४४ हजार २२६ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या खरेदीमुळे न्याय मिळाला असून हे वर्ष कापूस उत्पादकांना न्याय देणारे वर्ष ठरले आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
खरिपामध्ये धान उत्पादकांना गोसीखुर्दवरून आणखी पाणी मिळावे, गोसीखुर्दच्या पाण्याच्या वितरणातून चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाधिक भागामध्ये सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने जिल्ह्यात सुरु व्हावा, यासाठी त्यांनी नुकतीच नागपूर येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी वर्धा नदीच्या काठावर विस्तीर्ण प्रदेशात कापूस उत्पादकांची मोठ्या प्रमाणात संख्या असून या उत्पादकांनादेखील सिंचनाचा कसा फायदा होईल, यासंदर्भात लवकरच आढावा घेतला असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी यावर्षी कापूस खरेदी संदर्भात जिल्हा प्रशासनाने एप्रिल, मे व जून महिन्यामध्ये केलेल्या पाठपुराव्याचेदेखील कौतुक केले. जिनिंग मालकांनी काही ठिकाणी उत्तम सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पुढील काळात कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस तात्काळ खरेदी करता, यावा यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात विविध बैठका घेण्यात आल्या. गरज पडली तेव्हा अन्य राज्यातून ग्रेडर आणले गेले.

जिल्ह्यात ३६ कापूस खरेदी केंद्र
जिल्ह्यातील शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी करावी, असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. तसेच कापूस खरेदी संदर्भात जिनिंग-प्रेसिंग मालकांना निर्देश देण्यात आले होते. जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी ३६ कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. या कापूस खरेदी केंद्राद्वारे शासकीय हमीभावाने कापूस खरेदी करण्यात येत आहे. कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असूनदेखील पणन विभागाने विक्रमी २१८.७३ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. गेल्या १० वर्षात झाली नाही, अशी विक्रमी खरेदी यावर्षी झाली आहे. या खरेदीचे एकूण मुल्य ११,७७६.८९ कोटी रुपये असून आतापर्यंत ११,०२९.४७ कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. तसेच सीसीआयने ३० सप्टेंबर २०२० पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे.

Web Title: Purchase of 30 lakh 44 thousand 226 quintals of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.