शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी तालुक्यातील धानपीक नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:29 IST

तालुक्यातील अनेक गावातील धानपिकावर तुडतुडा, मावा, करपा, पाने गुंडाळणाºया अळ्यांच्या विविध रोगांच्या प्रादुर्भावाने हाती येणारे धानाचे पीक नष्ट झाले आहे.

ठळक मुद्देआर्थिक मदत द्या : अन्यथा १ नोव्हेंबरला एसडीओ कार्यालयासमोर निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावातील धानपिकावर तुडतुडा, मावा, करपा, पाने गुंडाळणाºया अळ्यांच्या विविध रोगांच्या प्रादुर्भावाने हाती येणारे धानाचे पीक नष्ट झाले आहे. यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व गाव परिसरातील धान पिकाचे सर्वेक्षण करून ब्रह्मपुरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा व नुकसानग्रस्त शेतकºयांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी किसान क्रांती मोर्चाचे तालुका समन्वयक विनोद झोडगे यांनी केली आहे.ब्रह्मपुरी तालुका हा धान उत्पादन तालुका म्हणून ओळखला जातो. विविध प्रकारच्या तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या धान पिकावर तुडतुडा, करपा, मावा यासारख्या विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे ऐन हातात येणाºया उत्पादनाचे नुकसान होण्याची भिती शेतकºयांमध्ये निर्माण झालेली आहे. भात पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने भात पीक घेणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. महागडी औषधी फवारणी करीत असतानाही रोग आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र ब्रह्मपुरी तालुक्यात दिसून येत आहे. परंतु आतापर्यंत शासन व प्रशासनाच्या वतीने शेताचे सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे सरकारविरुद्ध तिव्र असंतोष निर्माण झाला आहे.शासनाने तालुक्यातील सर्व शेतकºयांच्या धान पिकाचे सर्वेक्षण करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा १ नोव्हेंबर रोजी ब्रह्मपुरी एसडीओ कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता निदर्शने करण्याचा इशारा शेतकरी सुकानु समिती, किसान क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद झोडगे, प्रा. अमृत नखाते, मिलिंद भनारे, अ‍ॅड. गोविंदराव भेंडारकर, जि.प. सदस्य प्रमोद चिमूर, नामदेव नखाते, महेश पिल्लारे, अविनाश राऊत, मोंटू पिल्लारे, शरद ठाकरे आदी पदाधिकाºयांनी दिला आहे.