शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसुविधांची कामे झाली, पण गुणवत्तेबाबत तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, जनसुविधांच्या कामांसाठी शासन व नियोजन समितीतून निधी दिला जातो. नागरिकांच्या सुविधांची कामे दर्जेदार असायला पाहिजे.  जि. प. प्राप्त झालेला निधी खर्चाची मर्यादा दोन वर्षे असली तरी खर्चाची टक्केवारी ५० टक्के आहे. प्राप्त निधी त्याच वर्षात खर्च केल्यास अतिरिक्त निधी देता येतो. जि. प.कडे  बराच निधी शिल्लक आहे. यातून अनेक विकासकामे होऊ शकतात. विभागप्रमुखांनी कार्यवाही करावी.  पावसाळ्यापूर्वी माती व मुरुमाचे काम झाले पाहिजे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदमार्फत जनसुविधेची बरीच कामे झाली. मात्र गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे लोकसुविधांची  कामे दर्जेदार झाली पाहिजे. विकासकामांत गुणवत्ता ठायम ठेवावी फिल्डवर जाऊन तपासण्या कराव्यात अन्यथा कारवाई, असा इशारा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी जि. प. कन्नमवार सभागृहातील आढावा बैठकीत दिला.यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार व अन्य अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, जनसुविधांच्या कामांसाठी शासन व नियोजन समितीतून निधी दिला जातो. नागरिकांच्या सुविधांची कामे दर्जेदार असायला पाहिजे.  जि. प. प्राप्त झालेला निधी खर्चाची मर्यादा दोन वर्षे असली तरी खर्चाची टक्केवारी ५० टक्के आहे. प्राप्त निधी त्याच वर्षात खर्च केल्यास अतिरिक्त निधी देता येतो. जि. प.कडे  बराच निधी शिल्लक आहे. यातून अनेक विकासकामे होऊ शकतात. विभागप्रमुखांनी कार्यवाही करावी.  पावसाळ्यापूर्वी माती व मुरुमाचे काम झाले पाहिजे. खरीप हंगामासाठी खत व बियाणे उपलब्धतेवर लक्ष  देण्याच्या सूचनाही वडेट्टीवार यांनी केल्या. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपील कलोडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

७०० शाळांमध्ये सीसीटीव्ही- मुलींच्या संरक्षणासाठी ७०० शाळांत सीसीटीव्ही लावण्यासाठी शिक्षण विभागाने प्रस्ताव द्यावा.- शाळांची परिस्थिती व शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात. - प्रत्येक तालुक्यातून दहा याप्रमाणे किमान १५० शाळांमध्ये ई-लर्निंग बाबत नियोजन करा. १५ तालुक्यांत १६ मॉडेल स्कूल विकसित होत आहे. - पहिल्या टप्प्यात तीन शाळांसाठी साडेचार कोटी  प्राप्त झाले. मॉडेल स्कूलसाठी आणखी निधी देऊ, अशी ग्वाही वडेट्टीवार यांनी दिली.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार