शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यूमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून १ ऑक्टोंबरपर्यंत सात दिवस जनता कर्फ्यूची घोषणा केली. सुमारे सात दिवस किराणा सामान, डेली निड्स भाजी मार्केट आदी दुकाने पूर्णत: बंद राहणार असल्याचे मॅसेज सोशल मीडियावर वायरल झाले.

ठळक मुद्देखरेदीसाठी विक्रेत्यांची गर्दी : तेल, दाळ, तांदूळ, गहूच्या किमती वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्यामुळे बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली याचाच फायदा घेत ठोक विक्रेत्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ केली. त्यामुळे जनसामान्यांना मोठा फटका बसत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून १ ऑक्टोंबरपर्यंत सात दिवस जनता कर्फ्यूची घोषणा केली. सुमारे सात दिवस किराणा सामान, डेली निड्स भाजी मार्केट आदी दुकाने पूर्णत: बंद राहणार असल्याचे मॅसेज सोशल मीडियावर वायरल झाले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळू लागली. त्यामुळे मोठ्या व्यापारी, ठोक विक्रेते यांनी तेल, आटा, साखर, तांदूळ, गहूच्या दारात एका किलोमागे पाच ते दहा रुपयापर्यंतची वाढ केली. परंतु, सात दिवस दुकाने बंद राहिल्यास अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ग्राहकही अतिरिक्त दर देऊन साहित्यांची खरेदी करीत आहेत.भाजीपाला वधारलाजनता कर्फ्यूची घोषणा होताच बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. कांदा ३० रुपये किलोवरुन ६० रुपये किलो, टमाटर ५०, आलू ५०, फुलकोबी १००, वांगे ३० रुपये प्रति किलो विक्रीला होता. प्रत्येक किलोमागे किमान १० ते ३० रुपये वाढ करण्यात आली आहे. मात्र सात दिवस बाजारपेठ बंद राहत असल्याने नागरिकांना अडचण जात आहे.मुबलक साठा असूनही वाढजिल्हाबाह्य तसेच आंतरजिल्हा वाहतूक सुरळीत झाली आहे. तसेच ट्रांसपोर्टींग सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे किराणा वस्तू, भाजीपाला, दैनदिन वापराच्या वस्तूंची आयात निर्यात सुरळीत होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत सर्व वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र तरीसुद्धा विक्रेते कृत्रिम टंचाई भासूवून अतिरिक्त दराने वस्तूंची विक्री करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांना नाईलाजास्तव खरेदी करावी लागत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक